Nana Patekar : ‘तो काही सज्जन माणूस नव्हता, मी जे सहन केलंय ते…’, नाना पाटेकर यांच्याबद्दल काय बरळली तनुश्री दत्ता?
Tanushree Dutta on Nana Patekar : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले. ज्यामुळे नाना पाटेकर यांच्या अडचणीत देखील मोठी वाढ झालेली. आता नाना यांच्या निधनानंतर तनुश्री असं काही बरळली, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Tanushree Dutta on Nana Patekar : झगमगत्या विश्वात एका काळ असा देखील आला जेव्हा दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने गंभीर आरोप केलेल. हॉलिवूडमधील #MeToo मोहिम बॉलिवूडमध्ये आली आणि अनेक महिलांनी प्रसिद्ध सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले. यामध्ये तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले. जे नाना पाटेकर यांनी स्पष्टपणे फेटाळले. आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर जाणून घ्या नाना यांच्या निधनानंतर अभिनेत्री काय बरळली.
सांगायचं झालं तर, लखनऊ येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात तनुश्री हिला बोलावण्यात आलं होतं. सुरुवातील तिने नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलण्यासाठी नकार दिला. पण अभिनेत्रीला नानांवर केलेल्या जुन्या आरोपांबद्दल विचारल्यानंतर म्हणाली, ‘मी माझ्या आरोपांवर 100 टक्के ठाम आहे. त्यांचा 10 वेळा पुनर्जन्म झाला तरीही माझे आरोप तेच राहतील… सत्य ते सत्यच राहणार आहे… मी जे काही सहन केलंय, ते मी सांगू देखील शकत नाही.’
‘एका महिलेच्या विरोधात तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने लोकांना उभं करता. तो काही काही चांगला माणूस नव्हता. तो मन्या सुर्वेच्या, एका गँगस्टरच्या कुटुंबातला होता, तो सज्जन माणूस नव्हता…’, असं देखील तनुश्री बोलली, ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
एवढंच नाही तर, तनुक्षी असं देखील म्हणाली की, ‘प्रत्येकाचा शेवट हा असतोच… गेल्या काही दिवसांपासून मी सतत प्रार्थना करत होती आणि मुंबई सोडण्याच्या विचारत होती आणि माझ्या एका मंदिराच्या गावात स्थायिक होण्याचा विचार करत होता. कारण मला सुरक्षित वाटतच नव्हतं. गेव्या 5 – 7 वर्षात मी जे काही सहन केलं आहे, त्यानंतर मला कधीत सुरक्षित वाटलं नाही.’
‘मला माहिती नाही, पण एक वाईट व्यक्त मरण पावलीये… तुमचा द्वेष करणारी एक व्यक्ती मरण पावलीय. पण घडलेली कोणतीच गोष्ट विसरली जाऊ शकत नाही. 2018 पासून जे काही घडलं, त्या अनुभवांचे डाग मी कधीच पुसू शकत नाही…’, असं देखील तनुश्री दत्ता म्हणाली आहे.