AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidya Balan | विद्या बालन हिने मागितली 5 स्टार हॉटेलसमोर भीक, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, चाहतेही हैराण

विद्या बालन तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. विद्या बालन तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विद्या बालन हिने नुकताच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये विद्या बालन ही धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे.

Vidya Balan | विद्या बालन हिने मागितली 5 स्टार हॉटेलसमोर भीक, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, चाहतेही हैराण
| Updated on: Jul 01, 2023 | 7:00 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही नेहमीच चर्चेत असते. विद्या बालन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. विद्या बालन आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच विद्या बालन हिने हातामध्ये पेपर घेऊन एक फोटोशूट (Photoshoot) केले होते. विद्या बालन हिचे हे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. कारण या फोटोशूटमध्ये विद्या बालन ही पेपरच्या मदतीने आपले शरीर झाकताना दिसली होती. बाकी कपडे विद्या बालन हिने घातले नसल्याचे त्या फोटोशूटमध्ये दिसत होते. या फोटोशूटनंतर अनेकांनी विद्या बालन हिच्यावर टीका करण्यास देखील सुरूवात केली होती.

अनुपमा मालिकेतील एका डाॅयलाॅगवर एक व्हिडीओ विद्या बालन हिने काही दिवसांपूर्वीच शेअर केला होता. विद्या बालन ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. विद्या बालन ही सध्या तिच्या आगामी नीयत या चित्रपटात व्यस्त आहे. नीयत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विद्या बालन ही दिसत आहे. नुकताच एक मुलाखत विद्या बालन हिने दिलीये.

विद्या बालन हिने मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. विद्या बालन म्हणाली की, मी मुंबईच्या एका 5 स्टार हाॅटेलसमोर एकेकाळी भीक मागितली आहे. हे ऐकून चाहत्यांना देखील अत्यंत मोठा झटका बसला. मात्र, त्यावेळी नेमके काय घडले होते हे सांगताना विद्या बालन ही दिसली. यादरम्यान विद्या बालन हिने मोठा खुलासा केला.

विद्या बालन म्हणाली की, आमचा भारतीय संगीत समूह होता. ते दरवर्षीच भारतीय शास्त्रीय संगीत मैफलचे आयोजन करत असतं. विशेष म्हणजे ही मैफल रात्रभर चालत असायची. मी त्याच्या नियोजन समितीमध्ये होते. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आम्ही मदत करत असत. मैफल संपली की, आम्ही सर्वजण फिरण्यासाठी नरिमन पॉइंटला जात होतो.

त्यावेळी मला एकदा चॅलेंज दिले गेले की, कॉफी शॉपचे दार वाजवून त्यांच्याकडून जेवण मागायचे. मग काय मी एक अभिनेत्री होते आणि मी दार जोरात वाजवले आणि त्यांना म्हटले की, मी कालपासून जेवली नाहीये आणि मला भूक लागली आहे मला खायला काहीतरी द्या. विशेष म्हणजे मी ते चॅलेंज जिंकले. एकदा तर मी थेट 5 स्टार हाॅटेलच्या बाहेर बिस्किटांसाठी भीक मागितली होती आणि तेही चॅलेंज जिंकले होते.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.