विद्या बालन हिला ‘या’ चित्रपटाआधी निर्मात्याने… करिअरमधील त्या वाईट काळाबाबत विद्याचा खुलासा!

विद्या बालननं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ती आज एक ग्लॅमरस आणि हाॅट अशी अभिनेत्री आहे. तिनं तिच्या ग्लॅमरसनं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.

विद्या बालन हिला 'या' चित्रपटाआधी निर्मात्याने... करिअरमधील त्या वाईट काळाबाबत विद्याचा खुलासा!
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 8:46 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्या बालननं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ती आज एक ग्लॅमरस आणि हाॅट अशी अभिनेत्री आहे. तिनं तिच्या ग्लॅमरसनं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. पण, विद्या बालनला बाॅलिवूडमध्ये करिअर करताना सुरूवातीला काही दिवस खूप स्ट्रगल करावा लागला होता. त्यावेळी एक वेळ तिच्यावर अशी आली होती की तिला सगळे पनौती म्हणून चिडवत होते.

विद्या बालनला तिच्या अप्रतिम अभिनयासाठी इंडस्ट्रीत ओळखलं जातं. तिनं ‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं भूल भुलैया, डर्टी पिक्चर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, विद्या बालनला करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार, विद्याला त्यावेळी पनौती नावाचा टॅग लावला होता.

विद्या बालननं आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीतून केली होती. त्यानंतर तिनं साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. तिला सुपरस्टार मोहनलालचा पहिला चित्रपट मिळाला होता. त्यानंतर विद्याला इतर 12 मल्याळम चित्रपटांमध्ये कास्ट करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पण नंतर एक वेळ अशी आली की, सुपरस्टार मोहनलालचा चित्रपट काही कारणास्तव थांबला. तो चित्रपट बंद होण्यामागचं कारण विद्या बालनवर टाकण्यात आलं होतं. त्यामुळे तिला पनौती म्हणू लागले होते.

निर्मात्याने मागितलेली कुंडली

विद्या बालननं एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. ती म्हणाली की, मोहनलाल यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यांचं दक्षिणेत मोठं नाव होतं. पण जेव्हा त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग थांबलं तेव्हा लोकांनी मला पनौती असं संबोधलं होतं. जेव्हा तो चित्रपट थांबला तेव्हा मला वाटलं की लवकरच इतर चित्रपट सुरू होतील. पण, मला वृत्तपत्रांमधून समजलं की मला लोकांनी पनौती असं संबोधल्यामुळे काही चित्रपटांमधून बाहेर फेकले गेले होते.

विद्या बालनने सांगितलं होतं की, तिला नॉन डान्सर आणि दिसायला कुरूप म्हणून नाकारण्यात आलं होतं. एका निर्मात्यानं तर चित्रपट साइन करण्यापूर्वी तिची कुंडलीही विचारली होती. पुढे तिनं सांगितलं की, मला ऑफर केलेल्या चित्रपटात दुसऱ्या कोणाला तरी कास्ट करण्यात आलं होतं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.