AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Celebrity Beauty Tips : स्वस्त वस्तूंनी अभिनेत्री वाढवतात स्वतःचं सौंदर्य, सकाळी पितात ‘हे’ खास ड्रिंक

Celebrity Beauty Tips : तुम्हाला देखील हवी आहे अभिनेत्रींसारखी चमकदार त्वचा, अत्यंत स्वस्त वस्तूंनी 'या' अभिनेत्री स्वतःला ठेवतात सुंदर, त्यांचं वजन देखील राहतं नियंत्रित.... कोणत्या गोष्टीची वापर करतात अभिनेत्री? त्यांच्याबद्दल मोठं सत्य अखेर समो आलंच...

Celebrity Beauty Tips : स्वस्त वस्तूंनी अभिनेत्री वाढवतात स्वतःचं सौंदर्य, सकाळी पितात 'हे' खास ड्रिंक
| Updated on: Oct 15, 2023 | 9:15 AM
Share

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडतं. म्हणून महिला अनेक महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. ज्यामुळे सौंदर्य वाढतं, पण त्याचे साईड इफेक्ट देखील होत असतात. महत्त्वाचं म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे चमकदार स्किन मिळवण्यासाठी महिला आणि तरुणी कायम प्रयत्न कसतात. मुलाखतींमध्ये अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याचं रहस्य सांगत असतात. तर आज जाणून घेवू अभिनेत्री नक्की कोणत्या गोष्टींचा वापर करून स्वतःचं सौंदर्य वाढवतात. अत्यंत स्वस्त गोष्टींचा वापर करत अभिनेत्रींच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढत.. पण आरोग्यासंबंधी कोणतीही गोष्ट करण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला नक्की घ्यावा. ज्यामुळे आरोग्यास कोणतीही हानी पोहोचत नाही.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस | जॅकलीन फर्नांडिस तिच्या दिवसाची सुरुवात गव्हाच्या गवताच्या रसाने करते. या डिटॉक्स ड्रिंकमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर, ड्रिंकमुळे त्वचा देखील चमकदार होते. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध, व्हीटग्रासचा शरीरावर होणारा परिणाम थंड असतो. त्यामुळे गव्हाच्या गवताच्या उन्हाळ्यात रोज सेवन करणं फायदेशीर ठरेल. पण ड्रिंकचं मर्यादित प्रमाणातच सेवन करावं. अभिनेत्रीही याची विशेष काळजी घेते.

अभिनेत्री मौनी रॉय | मौनी कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली असते. मौनी रोज सकाळी हळदीचं पाणी पिते. एका ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यायल्यास त्वचा चमकदार होते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. हळदीचे पाणी पिण्याबरोबरच अभिनेत्री दालचिनीचं पाणी देखील पिते.

अभिनेत्री दीपिका पादुकोण | दीपिका हिच्या सौंदर्यात दिवसागणिक वाढ होत आहे. अभिनेत्री पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस आणि हॉट दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली असते. अभिनेत्री सकाळी लवकर ताज्या फळांचा रस पितात. एवढेच नाही तर ती तिच्या आहारात जास्तीत जास्त द्रवपदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात, त्यामुळे त्वचा चमकू लागते.

अभिनेत्री मलायका अरोरा | वयाच्या ४९ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्सॅमरस दिसते. मलायका चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते. रोज सकाळी अभिनेत्री कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पिते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर, ड्रिंकमुळे त्वचा देखील चमकदार होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.