
Bollywood Actress Ameesha Patel: एक काळ बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री अमीषा पटेल आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी तिच्या रॉयल आणि आलिशान लाईफ स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. अमीषा सोशल मीडियावर देखील कायम तिच्या घरातील फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या एका बॅगमुळे चर्चेत आली आहे. अमीषा हिच्याकडे 10 – 20 नाही तर, तब्बल 400 लग्जरी बॅग्स आहेत. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी कोरियोग्राफर फराह खान अमीषा पटेल हिच्या घरी गेलेली… तेव्हा अमीषाने तिच्या महागड्या बॅग्सचं कलेक्शन दाखवलं…
कोणतीही नवीन बॅग लॉन्च झाली तर, अमीषा पटेल सर्वातआधी पहिला पीस खरेदी करते. ‘आतापर्यंत कोट्यवधी रुपये बॅगवर खर्च केले आहेत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे. पण एका बँडच्या बॅग्स अभिनेत्रीला विषेश आवडतात. बरकिन ब्रँडच्या बॅग्स अमीषाला सर्वात जास्त आवडतात.
नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये अमीषा हिने बरकिन बॅग्सवर चर्चा केली. सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडे देखील बरकिन बॅग आहे आणि त्या बॅगची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. अशात बरकिन म्हणजे काय? असा प्रश्न देखील अभिनेत्रीला विचारण्यात आला.
यावर अमीषा म्हणाली, ‘बरकिन म्हणजे बॅग्सच्या जगातील रोल्स रॉयस… या बॅग्सची किंमत 13 लाखांपासून सुरु होते. ती बॅग कोट्यवधी रुपयांपर्यंत असते. बरकिन बॅग तुम्ही विकायला गेलात तर, त्याची दुप्पट किंमत मिळते… ही बॅग म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक आहे… ‘
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जपानमध्ये एक पद्धत आहे. जर तुम्हाला बँकेकडून लोन हवं असेल तर, तुम्ही बरकिन बॅग गहाण ठेवू शकता…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमीषा पटेल हिची चर्चा सुरु आहे. अमीषा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
अमीषा पटेल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘कहो ना… प्यार है’ सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली. पहिल्या सिनेमानंतर अमीषाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण हवी तशी लोकप्रियता मला मिळाली नाही… असा खुलासा अभिनेत्रीने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे.