Vinesh Phogat : विनेश फोगाट डिस्क्वॉलिफाय, सेलिब्रिटींचा संताप, म्हणाले, ‘हे योग्य नाही…’

Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगाट विरोधात कारस्थान... प्रयत्न करूनही विनेश फोगटच्या नशिबी अपयश, सेलिब्रिटींनी व्यक्त केला संताप, सोशल मीडियावर संतापाची लाट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विनेश फोगाटची चर्चा...

Vinesh Phogat : विनेश फोगाट डिस्क्वॉलिफाय, सेलिब्रिटींचा संताप, म्हणाले, हे योग्य नाही...
| Updated on: Aug 07, 2024 | 2:09 PM

Vinesh Phogat Disqualified: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीसाठी कुस्तीगीर विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेशने मंगळवारी उपांत्य फेरीत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा 5-0 गुणांनी पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामान्यकडे सर्वांचं लक्ष होतं. पण सामन्यापूर्वीचं विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. भारतीयांमध्ये सध्या निराशेचं वातावरण आहे.

विशेष फोगाट हिने 7 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात सुवर्णपदक स्वतःच्या नावावर केल्यामुळे भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण अंतिम सामन्याआधी भारतीयांना निराश करणारी बातमी समोर आली. यावर आता सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. स्वरा भास्कर, हुमा कुरैशी यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एक्स (ट्विटर)वर नाराजी व्यक्त केली आहे. हैराणी व्यक्त करत स्वरा भास्कर म्हणाली, ‘तुम्ही या 100 ग्रॅमच्या कहाणीवर विश्वास ठेवता?’ असा प्रश्न अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विचारला आहे.

 

 

अभिनेत्री हुमा कुरैशी हिने देखील सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. ‘कृपया मला कोणी सांगेल काय करता येईल त्यांना तिला लढू द्यावे लागेल…’ अशी पोस्ट हुमा कुरैशीने केली आहे. अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

 

 

युट्यूबर ध्रुव राठी याने दिखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘फक्त 100 ग्रॅमसाठी?? हे अत्यंत अविश्वसनीय वाटत आहे. फक्त टक्कल करून इतकं वजन कमी होऊ शकतं…’ असं ध्रुव राठी पोस्ट करत म्हणाला आहे.

अभिनेता अर्जुन रामपाल याने देखील नाराजी व्यक्त केली आहे. विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवणे अन्यायकारक आहे… असं अभिनेता पोस्टमध्ये म्हणाला. सध्या अर्जुन रामपाल याची पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.

 

 

अभिनेता म्हणाला, ‘बिलकूल नाही… त्यांनी 150 ग्रॅम अधिक वजन असल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवलं आहे? हे सत्य असूच शकत नाही. कृपया मला सांगा हे सत्य नाही… यामध्ये बदल होऊ शकतात अशा आशा आहे… अयोग्य… धक्कादायक…’ असं देखील अभिनेता म्हणाला.