वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचं जीवन मोठ्या पडद्यावर आलं तेव्हा… तणावपूर्ण वातावरणात सिनेमाचा रोमँटिक सीन शूट आणि…

मोठ्या पडद्यावर कसं उतरवलं होतं वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचं जीवन? तणावपूर्ण वातावरणात सिनेमाचा रोमँटिक सीन झालेला शूट... अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दीमुळे वाढलेल्या दिग्दर्शकाच्या अडचणी

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचं जीवन मोठ्या पडद्यावर आलं तेव्हा... तणावपूर्ण वातावरणात सिनेमाचा रोमँटिक सीन शूट आणि...
| Updated on: Jun 25, 2026 | 12:42 PM

वेश्याव्यवसांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये तयार झाले. पण 1981 आणि 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोन सिनेमांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही सिनेमातील काही गाणी आणि सीन्स चर्चेत असतात. सांगायचं झालं तर, प्रसिद्ध उर्दू लेखक मिर्झा हादी रुसवा यांची ‘उमराव जान अदा’ ही कादंबरी भारतीय साहित्यातील अत्यंत गाजलेल्या कलाकृतींपैकी एक मानली जाते. 1899 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीने केवळ साहित्यप्रेमींची मनंच जिंकली नाहीत, तर बॉलीवूड निर्मात्यांचेही लक्ष वेधून घेतलं. या कादंबरीवर आधारित पहिल्या सिनेमात अभिनेत्री रेखा यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली आणि सिनेमाचं नाव होतं ‘उमराव जान’, त्यानंतर प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

रेखा यांच्या ‘उमराव जान’ सिनेमाने रचला इतिहास…

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उमराव जान’ सिनेमाची ओळख हिंदी सिनेविश्वातील उत्तम सिनेमांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सिनेमात रेखा यांच्यासोबत फारूक शेख, राज बब्बर आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या अभिनेत्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. रेखा साकारलेल्या भूमिकेला तर, चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं… शिवाय सिनेमातील ‘इन आंखों की मस्ती’ आणि ‘दिल चीज क्या है’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 50 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर 19.35 कोटींची कमाई केली.

सिनेमातील रोमँटिक सीन

दिग्दर्शक मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘उमराव जान’ या सिनेमात फारुख शेख यांनी ‘नवाब सुलतान’ची भूमिका साकारली होती. या सिनेमातील एका रोमँटिक सीनचं चित्रीकरण लखनऊजवळील मलिहाबाद येथील एका खाजगी निवासस्थानी होणार होतं. मात्र, त्या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. लोकांची धक्काबुक्की सुरू असताना त्या सीनचं चित्रीकरण करणं सोपं काम नव्हतं, तरीही फारुख शेख आणि रेखा यांनी ते यशस्वीपणे पार पाडलं. हे रोमँटिक सीन चित्रित होत असताना, काही अनुचित प्रकार घडेल या भीतीने दिग्दर्शक आणि निर्माते गर्दीबाबत चिंतेत होते.

ऐश्वर्या राय स्टारर ‘उमराव जान’ सिनेमा

2006 मध्ये पुन्हा ‘उमराव जान’ सिनेमा तयार करण्यात आला. सिनेमात ऐश्वर्या राय हिच्यासोबत अभिषेक बच्चन, शबाना आझमी आणि सुनील शेट्टी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या सिनेमाने फक्त 19 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

Follow Us