रातोरात स्टार झालेली बॉलिवूडची ‘रबर गर्ल’ माहितीये? संपत्तीची उधळपट्टी केली, अखेर रस्त्यावर पडलेल्या भाज्या खाऊन जगण्याची वेळ
बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री जिने तिच्या डान्सच्या कलेवर यश मिळवलं. संपत्ती मिळवली. या अभिनेची लवचिकता आणि डान्सचे कौशल्य पाहून तिला सगळे "रबर गर्ल" म्हणायचे. पण कमावलेल्या संपत्तीचा विचार न करता फक्त उधळपट्टी केली अन् नंतर याच अभिनेत्रीला रस्त्यावर पडलेल्या भाज्या खाऊन जगण्याची वेळ आली.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आणि आजही आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या डान्ससाठी जास्त ओळखल्या गेल्या आहेत. त्यात सगळ्यात आधी नाव येतं ते दिग्गज अभिनेत्री हेलन यांचे. पण त्याआधी एका अभिनेत्रीचं नाव येतं जिला बॉलिवूडची ‘रबर गर्ल’ म्हणून ओळखलं जायचं. होय, बॉलिवूड कॅबरे डान्सर म्हणून लोकप्रियता या अभिनेत्रीने मिळवली होती. लवचिकता आणि नृत्य कौशल्यामुळे या अभिनेत्रीला ‘रबर गर्ल’ ही पदवी मिळाली होती. अनेक चित्रपटांमधून या अभिनेत्रीने स्वत:ची अशी खास ओळख निर्माण केली होती.
बॉलिवूड कॅबरे डान्सर म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री
1949 आणि 1950 च्या दशकात बॉलिवूड कॅबरे डान्सर म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे कुक्कू मोरे. या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात उत्तम पद्धतीने केली होती. कुक्कू मोरे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1928 रोजी एका अँग्लो-इंडियन कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. 1946 मध्ये आलेल्या “अरब का सितारा” या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या लवचिक शरीरयष्टीने आणि अभिनय कौशल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची लवचिकता आणि नृत्य कौशल्य पाहून त्यांना “रबर गर्ल” म्हणू जावू लागलं. त्यांनी “अनोखी अदा,” “बरसात,” “पतंगा,” “अंदाज,” आणि “शायर” सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कॅबरे नृत्य सादर केले आहे. त्या काळासाठी त्यांची फी देखील खूपच जास्त होती. त्या एका डान्ससाठी तब्बल 6000 रुपये घ्यायच्या जे अनेक स्टार्सपेक्षा जास्त होते. यामुळे काही लोकांना त्याचा हेवाही वाटायचा.
हेलनला चित्रपटांचा मार्ग दाखवला
कुक्कू मोरे आणि हेलन हे कौटुंबिक मित्र होते. कुक्कू यांनीच हेलनला बॉलिवूडमध्ये येण्याची संधी दिली. त्यांनी “येहुदी” आणि “हीरा मोती” सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र नृत्य केले. कुक्कू यांनी अभिनेता प्राणला चित्रपटांमध्येही लाँच केले.

cuckoo moray
पैशांची उधळपट्टी
कुक्कू यांनी जेवढी संपत्ती मिळवली, जेवढी कमाई केली होती त्यापेक्षा जास्त खर्च केले. मुंबईत त्यांचा एक मोठा बंगला होता. महागड्या गाड्या होत्या, दागिने होते आणि एक भव्य जीवनशैली होती. त्या एवढ्या श्रीमंत झाल्या होत्या की त्यांनी त्यांच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्यासाठी कार देखील खरेदी केली होती. असे म्हटले जाते की तिच्या उधळपट्टी स्वभाव आणि गुंतवणुक मात्र काहीच नसल्याने शेवटी गरिबी आली. शेवटी शेवटी त्यांनी कर भरण्यातही टाळाटाळ केली ज्यामुळे आयकर विभागाने छापे टाकले आणि त्यांची मालमत्ता जप्त केली. काम संपले आणि त्या हळूहळू त्या बॉलिवूडपासूनही दूर गेल्या.
कुजलेल्या किंवा टाकून दिलेल्या भाज्या आणि फळे त्या आणायच्या
काही कालांतराने कुक्कू यांना कर्करोगाचे निदान झाले. पण त्यांच्याकडे तेव्हा उपचारासाठी पैसेही नव्हते. त्यांच्यावर उपाशी झोपण्याची वेळ आली. त्यांच्यावर एवढी वाईट वेळ आली होती की त्या अनेकदा बाजारातून कुजलेल्या किंवा टाकून दिलेल्या भाज्या आणि फळे आणायच्या आणि शिजवून ते खात असे. जेव्हा तबस्सुमने तिच्या शोमध्ये कुक्कूचा उल्लेख केला तेव्हा त्यांनीही म्हटले की ती स्वतःच तिच्या परिस्थितीसाठी जबाबदार होती. कारण तिला तिच्या संपत्तीची किंमत नव्हती.
कुक्कू मोरे यांचे निधन
30 सप्टेंबर 1981 रोजी कुक्कू मोरे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. बॉलिवूडमधीलही व्यक्ती उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्या कफन आणि अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेसाठी निधी संकलन देणग्यांद्वारे करण्यात आले.
