सलमानच्या मेहुण्याने 7 वेळा पाहीला होता ऐश्वर्याचा हा चित्रपट, ऋतिक रोशनच्या केवळ एका सीनसाठी
बॉलिवूड स्टार सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याने ऐश्वर्याचा एक चित्रपट तब्बल ७ वेळा पाहिला आहे. तोही फक्त एका सीनसाठी...

बॉलीवूड स्टार सलमान खान याची बहिण अर्पिता हीचा नवरा आयुष शर्मा हा स्वत: देखील अभिनेता आहे. त्याने ऐश्वर्याचा एक चित्रपट ७ वेळा पाहिल्याची कबुली दिली आहे. आयुष शर्मा याने तो अभिनेता हृतिक रोशन याचा मोठा चाहता असल्याने त्याच्यासाठी हा चित्रपट सात वेळा पाहिल्याची एका मुलाखतीत म्हटले आहे. हृतिक रोशन याच्या डान्स स्टेपचे वेड अनेकांना लागले होते. ९० च्या दशकात तर हृतिक रोशन याच्या डान्ससाठी चित्रपटागृहात गर्दी होत असे. सलमानचा मेहुणा लागणारा आयुष शर्मा याने हृतिकच्यामुळे धूम-२ हा चित्रपट सात वेळा पाहिल्याचे म्हटले आहे.
हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांचा धूम – २ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर ब्लॉकबस्टर हीट झाला होता. हृतिक रोशन याने या चित्रपटातील भूमिकेने सर्वांना वेड लावले होते. या परंतू या चित्रपटातील एका सीनसाठी हा चित्रपट आपण सात वेळा पाहील्याचे आयुष शर्मा याने म्हटले आहे. या चित्रपटात हृतिक सोबत ऐश्वर्या राय हीने लीड रोल केला होता.
आयुषने 7 वेळा का पाहीला ‘धूम 2’?
आयुष शर्मा याने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर मुलाखत देताना ऋतिक रोशन संबंधीत एक आठवण सांगितली. हृतिकची आपण किती मोठा फॅन आहे हे सांगताना आयुष म्हणाला की हृतिक सरांचा धूम – २ मी अक्षरश: वेड्यासारखा पाहीला होता. तो ही एका शॉटसाठी…त्या सीनमध्ये ते स्लो मोशनमध्ये चालतात. क्लीन शेव्हमध्ये होते. आणि त्यांचे केस कपाळापर्यंत आले होते. त्यान सीनसाठी मी हा चित्रपट सात वेळा पाहिल्याचे शर्मा याने सांगितले.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई
२४ नोव्हेंवर २००६ रोजी रिलीज झालेल्या धूम-२ चे दिग्दर्शन संजय गढवी यांनी केले होते. हृतिक आणि ऐश्वर्यासह या चित्रपटात अभिषेक बच्चन , उदय चोपडा आणि बिपाशा बासू यांनी देखील काम केले होते. धूम-२ बनविण्यासाठी निर्मात्यांनी ३५ कोटी रुपये खर्च केले होते. परंतू त्यांना प्रचंड फायदा झाला. भारतात या चित्रपटाचे कलेक्शन ८१ कोटी आणि वर्ल्ड वाईट १४७ कोटींचे कलेक्शन जमा झाले होते. त्यामुळे धूम – २ बॉक्स ऑफीसवर सुपर हीट झाली होता.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
अर्पिता खान याच्याशी आयुषचं लग्न
‘लवयात्री’, ‘अंतिम’, आणि ‘रुस्लान’ सारख्या चित्रपटातून नशीब आजमावणाऱ्या आयुष शर्मा याने साल 2014 मध्य सलमानची बहिण अर्पिता खान हीच्याशी लग्न केले आहे.अर्पिता सलमानचे वडील सलीम खान आणि त्यांची दूसरी पत्नी हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. अर्पिता आणि आयुष यांना दोन मुले आहेत.
