AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal | एका बोल्टने केली मोठी गडबड! विकी कौशल कायद्याच्या कचाट्यात अडकता अडकता वाचला!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी चित्रपटामुळे कायदेशीर अडचणीत सापडला होता. इंदूरमध्ये सुरू असलेल्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये तो सारा अली खानसोबत इंदूरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसला होता.

Vicky Kaushal | एका बोल्टने केली मोठी गडबड! विकी कौशल कायद्याच्या कचाट्यात अडकता अडकता वाचला!
Vicky Kaushal
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 1:58 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी चित्रपटामुळे कायदेशीर अडचणीत सापडला होता. इंदूरमध्ये सुरू असलेल्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये तो सारा अली खानसोबत इंदूरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसला होता. या फोटोमध्ये दिसणाऱ्या बाईकमुळे एका व्यक्तीने विकी कौशलविरोधात तक्रार दाखल केली होती.

या व्यक्तीने विकी कौशल याच्यावर वाहन क्रमांक चोरल्याचा आरोप केला होता. जयसिंग यादव नावाच्या तक्रारदाराने सांगितले की, “चित्रपटाच्या सीक्वेन्समध्ये वापरलेला वाहन क्रमांक माझा आहे. चित्रपट युनिटला याची माहिती आहे की, नाही हे माहित नाही. मात्र, ते वैध नाही, परवानगीशिवाय ते माझी नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. मी याबाबत निवेदन दिले असून, याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे.”

View this post on Instagram

A post shared by $@M (@samthebestest_)

बोल्टमुळे गैरसमज झाला!

यानंतर बाणगंगा उपनिरीक्षक राजेंद्र सोनी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. आता तपास केल्यानंतर एसआयने तक्रारदाराचा गैरसमज दूर केला आहे. ते म्हणाले- ‘नंबर प्लेट तपासताना आम्हाला आढळले की, हा सर्व गैरसमज नंबर प्लेटवरील फिक्स बोल्टमुळे झाला आहे. त्या बोल्टमुळे तो क्रमांक एक ऐवजी चार क्रमांकासारखा दिसत होता. तर मूव्ही सीक्वेन्समध्ये वापरलेला नंबर हा चित्रपट निर्मिती टीममधीलच आहे. त्यामुळे तपासादरम्यान आम्हाला काहीही बेकायदेशीर आढळले नाही.’

त्याचवेळी पोलिसांसोबतच प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित एका व्यक्तीनेही बाईकची नंबर प्लेट टीममधील सदस्याची असल्याचे सांगितले आहे. नंबर प्लेट लावण्यासाठी बोल्टचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही नंबर प्लेट केवळ प्रोडक्शन हाऊसच्या सदस्याची आहे. प्रोडक्शन हाऊसच्या एका सदस्याने एएनआयला असेही सांगितले होते की नंबर प्लेट्स बसवण्यासाठी बोल्टचा वापर केला जातो. आता या प्रकरणाच्या तपासात विकी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

नवविवाहित अंकिता लोखंडेच्या बॅकलेस मादक लूकने केलं घायाळ, पाहा नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक PHOTOS

Devon Ke Dev–Mahadev फेम मोहित रैनानं गुपचूप उरकलं लग्न, चाहत्यांना दिलं सरप्राइज

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.