Aamir Khan: ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला आमिर खानचं समर्थन; घरावर फडकावला तिरंगा

केंद्र सरकारने जनतेला 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरांवर तिरंगा फडकावण्याचं आवाहन केलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी आमिर त्याच्या घराच्या बाल्कनीत मुलगी इरा खानसोबत दिसला. यावेळी बाल्कनीच्या रेलिंगला तिरंगाही लावल्याचं पहायला मिळालं.

Aamir Khan: 'हर घर तिरंगा' मोहिमेला आमिर खानचं समर्थन; घरावर फडकावला तिरंगा
Aamir Khan
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 13, 2022 | 10:04 AM

लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एक दिवसानंतर आमिर खान (Aamir Khan) त्याच्या घरावर तिरंगा (tricolour) फडकावत ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहिमेत सहभागी झाला. ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या मोहिमेअंतर्गत लोकांना तिरंगा घरी आणून आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने तो घरावर फडकावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येतंय. केंद्र सरकारने जनतेला 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरांवर तिरंगा फडकावण्याचं आवाहन केलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी आमिर त्याच्या घराच्या बाल्कनीत मुलगी इरा खानसोबत दिसला. यावेळी बाल्कनीच्या रेलिंगला तिरंगाही लावल्याचं पहायला मिळालं.

गुरुवारी आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्याने जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी आमिर खान हा आसामला जाणार होता, पण त्याचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विनंतीनंतर आमिरने स्वातंत्र्यदिनाच्या समारंभापर्यंत आसामचा प्रस्तावित दौरा पुढे ढकलला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, लाल सिंग चड्ढा या चित्रपटावरून आमिर आणि इतरांविरुद्ध भारतीय सैन्याचा अनादर आणि हिंदू भावना दुखावल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटात एका मतिमंद व्यक्तीला कारगिल युद्धात भारतीय सैन्यात सामील होण्याची परवानगी कशी दिली जाते यावर आक्षेप घेण्यात आला आहे. चित्रपटातील आमिरच्या संवादावरूनही वाद सुरू आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार ‘लाल सिंग चड्ढा’ने पहिल्या दिवशी जवळपास 10 ते 11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसरीकडे या चित्रपटाला पायरसीचाही फटका बसला आहे. आमिरचा हा चित्रपट तमिळरॉकर्स, फिल्मीझिला, मूव्हीरुल्ज, टेलिग्राम यांसह इतर प्लॅटफॉर्म्सवर एचडी व्हर्जनमध्ये लीक झाला आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें