Aamir Khan Kiran Rao Divorce : सुपरहिट सिनेमे देणारा बॉलिवूड स्टार जेव्हा मराठमोळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, वाचा किरण रावमुळे काय काय घडलं?

| Updated on: Jul 03, 2021 | 1:42 PM

थ्री इडियटससारखे सुपरहिट सिनेमे देणारा बॉलिवूड स्टार की बीडपासून नाशिकपर्यंत मराठमोळ्या दुष्काळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा एकमेव बॉलिवुड स्टार. (Aamir Khan Kiran Rao Divorce: When the Bollywood star who gave superhit movies goes to the dam of farmers, read what happened because of Kiran Rao?)

Aamir Khan Kiran Rao Divorce : सुपरहिट सिनेमे देणारा बॉलिवूड स्टार जेव्हा मराठमोळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, वाचा किरण रावमुळे काय काय घडलं?
Follow us on

मुंबई : आमिर खानची नेमकी ओळख कुठली? दंगल, तारे जमीन पर, पी.के., थ्री इडियटससारखे सुपरहिट सिनेमे देणारा बॉलिवूड स्टार की बीडपासून नाशिकपर्यंत मराठमोळ्या दुष्काळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा एकमेव बॉलिवुड स्टार. खरं तर त्याची एक ओळखं सांगणं त्याच्या कामावर अन्याय करणारं ठरेल. पण जमीनवर राहून यशाची तारे घेऊन फिरणारा
तो एकमेव बॉलिवूड स्टार आहे हे निश्चित. त्याच्या कामाची सर इतर कोणत्याच खान, कपूरला जमलेली नाही.

किरण रावमुळे चमत्कार घडला
लगान सिनेमाच्यावेळेस किरण राव आणि आमिर खान यांची भेट झाली. त्यातून प्रेम झालं आणि नंतर दोघांनी लग्नही केलं. पण किरण रावनं आमिर खानच्या आयुष्यात सप्तरंग फुलवले. एककीडे त्याच्या सिनेमांचा दर्जा सुधारला तर दुसरीकडे तो जमीनीशी घट्ट जुळला जाईल असही बघितलं. किरण रावमुळे आमिर खान हा पाणी फाऊंडेशनशी जोडला गेला आणि त्यातून दोघांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात काम सुरु केल्याचं खुद्द त्याचे निकटवर्तीय सांगतायत. लगानच्या आधी आमिर खान काही काळ सिनेमापासून दूर होता. त्याला डिप्रेशननं घेरल्याचीही त्यावेळेस चर्चा होती. असं पुन्हा घडू नये म्हणूनच आमिर खाननं सिनेमा करताना निवडकच केले आणि दुसरीकडे तो खऱ्याखुऱ्या जगाशी संबंध राहावा म्हणून दुष्काळी कामात त्यानं झोकूनही दिलं.

पाणी फाऊंडेशनचं महाराष्ट्रभर काम
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काही भाग दुष्काळी आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 90 टक्के दुष्काळी भागात पाणी फाऊंडेशनचं काम सुरु आहे. किरण राव आणि आमीर खान ह्या दोघांनी मिळून पाच एक वर्षापूर्वी ही संस्था स्थापन केली. तिच्याच माध्यमातून ऐन उन्हाळ्यात किरण राव आणि आमिर खान दोघेही दुष्काळी बांधावर घाम गाळत असतात. वेगवेगळ्या भागात पाणी सिंचनाचं काम केलं जातं. पाणी फाऊंडेशन तर्फेच वॉटर कप स्पर्धा आयोजीत केली जाते. महाराष्ट्रातली गावं पाण्यासाठी काम करतात आणि तेच पुढं ह्या स्पर्धेत भाग घेतात. गावाला पहिलं बक्षीस पाऊण कोटीच्या
आसपास होतं.

दुसरीकडे सुपरहिट फिल्मस
आमिर खानच्या आयुष्याचे दोन टप्पे सरळ सरळ पाडतात येतात. किरण राव भेटण्यापुर्वीचं आमिर खानचं आयुष्य आणि तिच्याशी लग्न झाल्यानंतरचं एक आयुष्य. किरण राव भेटण्यापुर्वीच्या आमीर खानचं आयुष्य एक बॉलिवूड स्टारचं आयुष्य होतं. ज्यात चढउतार होते. कयामत से कयामत, दिल, सरफरोश असे हिट सिनेमे त्यानं त्यावेळेसही दिलेले होते पण अस्थिरता अधिक होती. बाजी, मेला, अकेले हम अकेले तुम असे सिनेमे कधी आले आणि कधी गेले ते कळालेही नाहीत. पण लगानच्या काळात आमिरला किरण राव भेटली आणि त्याची निवड बदलली. गेल्या पंधरा वर्षातल्या आमिर खानच्या फिल्म बघितल्या तर त्यात हिट सिनेमे जास्त दिसतील. मग थ्री एडिटस, रंग दे बसंती, पी.के. दंगल. गझनी, फनाह अशा सिनेमांचा समावेश होतो आणि अर्थातच दिल चाहता है ला विसरु कसं चालेल.

आमिर खान हा एकमेव स्टार आहे जो पवार, ठाकरे या नेत्यांशीही जोडला गेलाय तो त्याच्या पाण्यासाठी चालत असलेल्या कामातून. एकाच वेळेस सुपरहिट सिनेमे देत जाणं आणि दुसरीकडे खऱ्या खुऱ्या लोकांमध्ये जाऊन पाण्यासाठी काम करणं हे वाटतं तेवढं सोप्पं नाही. हे त्याच वेळेस होऊ शकतं जेव्हा किरण रावसारखी वास्तवादी पत्नी आयुष्यात असते.

संबंधित बातम्या

Aamir Khan Kiran Rao Divorce: ‘पीके’चा वाद ते देश सोडून जाण्याची भाषा; वाचा, आमिर खानचे 5 मोठे वाद

Aamir Khan Kiran Rao Divorce : शाही घराण्यातील मुलगी ते मिस्टर परफेक्शनिस्टची पत्नी; वाचा किरण रावची कहाणी

Aamir Khan Kiran Rao Divorce: घटस्फोट शेवट नव्हे, नवी सुरुवात, आमिर खान-किरण रावचं पत्र जसंच्या तसं!