Aamir Khan Kiran Rao Divorce: ‘पीके’चा वाद ते देश सोडून जाण्याची भाषा; वाचा, आमिर खानचे 5 मोठे वाद

अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. कधी त्यांच्या सिनेमामुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांनी हे दोघेही वादात राहिले आहेत. (Amir Khan)

Aamir Khan Kiran Rao Divorce: 'पीके'चा वाद ते देश सोडून जाण्याची भाषा; वाचा, आमिर खानचे 5 मोठे वाद
Amir Khan

मुंबई: अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. कधी त्यांच्या सिनेमामुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांनी हे दोघेही वादात राहिले आहेत. एकदा तर आमिरने पत्नीला भारतात राहण्याची भीती वाटत असल्याचं विधानही केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावरून दोघांवर टीकेची झोडही उठली होती. आमिर खान आणि त्याच्याशी संबंधित अशाच पाच मोठ्या वादावर टाकलेली ही नजर. (5 shocking controversies of Bollywood’s Mr. Perfectionist)

असहिष्णुतेचा वाद

पाच वर्षापूर्वी आमिर खानने एक विधान करून देशभर खळबळ उडवून दिली होती. पत्नी किरण रावला देशात राहण्याची भीती वाटत असल्याचं आमिरने म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी आमिरवर टीका केली होती. तर बऱ्याच लोकांनी त्याच्या विधानाचं समर्थनही केलं होतं. अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल यांनीही आमिरच्या या विधानाचा समाचार घेतला होता. अनेक दिवस हे प्रकरण चांगलंच गाजत होतं.

पीकेवरूनही वाद

आमिर खानचा ‘पीके’ हा सिनेमाही वादग्रस्त ठरला होता. 2014मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला विरोध झाला होता. आमिरचं न्यूड पोस्टर आणि हिंदू धर्मावर सिनेमातून करण्यात आलेलं तिरकस भाष्य यामुळे आमिरवर टीका करण्यात आली होती. हिंदू संघटनांनी या सिनेमाला विरोध करत अनेक ठिकाणी आमिरच्या पोस्टरची होळीही केली होती.

आमिताभवरील वक्तव्याने अडचणीत

2005मध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ‘ब्लॅक’ हा सिनेमा आला होता. त्यावरून आमिरने वादग्रस्त विधान केलं होतं. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांची व्यक्तिरेखा आपल्या डोक्यावरून गेल्याचं आमिरने म्हटलं होतं. त्यावरून आमिरवर टीका करण्यात आली होती. या विधानामुळे आमिर आणि अमिताभ यांच्यात वितुष्ट आल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

मुलीसोबतच्या त्या फोटोमुळे ट्रोल

आमिर खान पुन्हा एकदा ट्रोल झाला. वादग्रस्त ठरला. ते त्याच्या वक्तव्याने किंवा सिनेमामुळे नाही. तर त्याच्या एका फोटोमुळे. आमिरने मुलगी इरा खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत इरा आमिरच्या अंगावर बसलेली दिसत आहे. ट्रोलर्संना हा फोटो आवडला नव्हता. या फोटोवर अनेक यूजर्सनी खालच्या थराला जावून कमेंट्स केल्या होत्या.

भावाबरोबर हाणामारी

आमिर खानचा भाऊ फैजल खानने आमिरवर मारहाणीचा आरोप केला होता. आमिरने आपला अपमान केला. पैशाच्या व्यवहारावरून आपल्याला मारहाण केली, असा आरोप फैजल खानने केला होता. अनेक दिवस हे प्रकरण गाजत होतं.

कुत्र्याच्या नावावरून वाद

आमिर खानने आणखी एक वाद ओढवून घेतला होता. त्याने कुत्र्याचं नाव ‘शाहरुख’ असं ठेवलं होतं. त्यामुळे वाद झाला होता. ट्रोलर्सनी या नावावरून आमिरला प्रचंड झापले होते. हा वाद प्रचंड वाढल्याने अखेर आमिरला सोशल मीडियावरून या प्रकरणावर खुलासा करावा लागला होता. आमिरच्या या वागण्यामुळे आमिर आणि शाहरुख खानमध्ये कोल्डवॉर सुरू असल्याचं दिसून आलं होतं. (5 shocking controversies of Bollywood’s Mr. Perfectionist)

 

संबंधित बातम्या:

Aamir Khan Kiran Rao Divorce: घटस्फोट शेवट नव्हे, नवी सुरुवात, आमिर खान-किरण रावचं पत्र जसंच्या तसं!

Amir Khan Kiran Rao Divorce: हा शेवट नव्हे तर सुरुवात; आमिर खान-किरण रावच्या मुलाचा ताबा आता कोणाकडे?

Amir Khan Kiran Rao Divorce | आता आम्हाला आमच्या आयुष्यातली नवी इनिंग सुरु करायचीय, किरण -आमिर खानचा पंधरा वर्षानंतर तलाक!

(5 shocking controversies of Bollywood’s Mr. Perfectionist)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI