Aamir Khan Kiran Rao Divorce: ‘लगान’च्या सेटवर पहिली भेट, 30 मिनिटाच्या कॉलचा प्रभाव; वाचा, अशी बहरली आमिर-किरणच्या प्रेमाची कहाणी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 03, 2021 | 12:39 PM

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानने पत्नी किरण रावपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तशी पोस्टच व्हायरल केली आहे. (Aamir Khan on Kiran Rao)

Aamir Khan Kiran Rao Divorce: 'लगान'च्या सेटवर पहिली भेट, 30 मिनिटाच्या कॉलचा प्रभाव; वाचा, अशी बहरली आमिर-किरणच्या प्रेमाची कहाणी
aamir khan kiran rao

मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानने पत्नी किरण रावपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तशी पोस्टच व्हायरल केली आहे. तब्बल 15 वर्षाच्या संसारानंतर या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लगान’च्या सेटवर पहिल्यांदा भेट झाल्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रुपांतर सहजीवनात झालं. त्यानंतर आता दोघेही विभक्त होत असल्याने दोघांच्याही चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (Can’t imagine my life without her, Aamir Khan on Kiran Rao)

‘लगान’च्या सेटवर पहिली भेट

आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट ‘लगान’च्या सेटवर झाली होती. स्वत: आमिरनेच त्याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. त्यावेळी किरण माझ्यासाठी फक्त माझी टीम सदस्य होती. ती असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. रीनाला (पहिली पत्नी) घटस्फोट दिल्यानंतर मी किरणला भेटलो. त्यावेळी आमची खास बातचीत झाली नाही. त्यावेळी ती माझी मैत्रीणही नव्हती, असं आमिरने सांगितलं होतं. किरणच्या करिअरची सुरुवातही ‘लगान’पासूनच झाली होती. त्यानंतर तिने आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेस’साठीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्याशिवाय तिने ‘दिल चाहता है’ या सिनेमात कॅमिओ रोलही केला होता.

30 मिनिटाच्या कॉलमुळे प्रभावीत

आमिर नुसताच मिस्टर परफेक्शनिस्ट नाही तर तो बुद्धिमान अभिनेता आहे. किरणही बुद्धिमान दिग्दर्शिका आहे. किरणच्या बुद्धिमतेवरच प्रभावीत झाल्याचंही त्याने कबुल केलं होतं. रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर मी मानसिक तणावात होतो. तेव्हा एकदा किरणने मला फोन केला होता. आम्ही फोनवर किमान 30 मिनिटं म्हणजे अर्धातास बोलत होतो. किरणच्या बोलण्यावर मी प्रभावित झालो. त्यानंतर मी किरणला डेट करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे आम्ही एकमेकांना भेटत होतो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असं त्याने सांगितलं होतं. किरणशिवाय आयुष्य हा विचारच मी करू शकत नाही, असंही तो म्हणाला होता. 2005मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं. आता या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

किरण शाही कुटुंबातील

किरण राव ही शाही कुटुंबातील आहे. तिचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी हे तेलंगणा राज्यात आहे. किरण ही आदिती राव हैदरीची बहीण आहे. आदितीही शाही कुटुंबातील आहे. (Can’t imagine my life without her, Aamir Khan on Kiran Rao)

संबंधित बातम्या:

Amir Khan Kiran Rao Divorce | अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

दिनो मोरिया हा BMC चा सचिन वाझे; सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील; नितेश राणेंचं सूचक विधान

Birthday Special : कधी पोलिसांचा मार खाल्ला, तर कधी प्रतिस्पर्धी खेळाडूला मैदानातच हाणले, जाणून घ्या हरभजन सिंगबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी

(Can’t imagine my life without her, Aamir Khan on Kiran Rao)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI