AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न मोडूनही ‘या’ अभिनेत्रीला तिचा पती देतोय त्रास, गंभीर आरोप करत म्हणाली…

लग्नाला काही महिने पूर्ण होताच दलजीत काैर ही भारतामध्ये परतली. दलजीत काैर ही भारतामध्ये परतल्यानंर निखिल पटेल आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगताना दिसली. मात्र, यावर काही दिवस भाष्य करणे दलजीत काैर हिने टाळले. काही दिवसांपूर्वीच दलजीत काैर हिने पती निखिल पटेल याच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर निखिल यानेही तिच्यावर आरोप केले.

लग्न मोडूनही 'या' अभिनेत्रीला तिचा पती देतोय त्रास, गंभीर आरोप करत म्हणाली...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 15, 2024 | 8:29 PM
Share

अभिनेत्री दलजीत काैर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. दलजीत काैर हिने दहा महिन्यांपूर्वीच केनियाचा व्यावसायिक निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे भारतामध्ये अत्यंत खास पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. अनेक कलाकार हे दलजीत काैर हिच्या लग्नासाठी पोहोचले होते. दलजीत काैर ही निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर केनियाला आपल्या मुलासोबत शिफ्टही झाली. निखिल पटेल याच्यासोबतचे हे लग्न दलजीतचे दुसरे लग्न होते. तिचे पहिले लग्न अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले. मात्र, काही वर्षांनी यांचा घटस्फोट झाला. शालिन भनोट आणि दलजीत काैर यांचा एक मुलगा देखील आहे.

निखिल पटेल याने तिला एक कायदेशीर नोटीसही पाठवली. दलजीत काैर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद वाढलाय. दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्या विरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली. निखिल पटेल याने दलजीत काैर हिच्यासोबत झालेले लग्न मान्य करण्यासही नकार दिलाय. आता निखिल पटेल याने एक पोस्ट शेअर करत दलजीत काैर हिच्यावर गंभीर आरोप केले. त्या आरोपांना उत्तर देताना दलजीत काैर ही दिसली. हेच नाही तर आता दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्यावर गंभीर आरोपही केलाय. दलजीत काैरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, तुझ्या पेड पीआरचा वापर कर आणि मला सांग कधी मला माझे चॅनल परत मिळेल. विचार त्यांना तुझे बँक खाते माझ्या चॅनलशी जोडलेले गेलेले. निखिल पटेल तुला काय गरज पडली त्या मुलाचे चॅनल हडप करण्याची जिच्यासोबत लग्न न करण्याचा दावा तू केलाय.

तिच्या मुलासोबतही तुला काही देणे घेणे नाहीये. मला माझे अकाऊॅंट वापस हवे आहे. माझ्या चॅनेलवरून तुझे बँक खाते काढून टाक. हेच नाही तर दलजीत काैर हिने केन्याच्या कंपनीकडे मदत देखील मागितली आहे. आता दलजीत काैर हिच्या या आरोपांवर निखिल पटेल हा काय उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यांच्यातील वाद हा वाढताना दिसतोय.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा