आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटिंग; मनसेच्या नेत्याने घेतला आक्षेप

अभिनेत्री दिशा पटानी हिच्याशी असलेली आदित्य ठाकरे यांची मैत्री हा तर विशेष चर्चेचा विषय आहे. | Disha Patani aditya thackeray

आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटिंग; मनसेच्या नेत्याने घेतला आक्षेप
आदित्य ठाकरे यांची बॉलीवूमधील अनेक कलाकारांशी चांगली मैत्री आहे. अभिनेत्री दिशा पटानी हिच्याशी असलेली आदित्य ठाकरे यांची मैत्री हा तर विशेष चर्चेचा विषय आहे.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 10:58 AM

मुंबई: राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे वरळीत सर्रासपणे उल्लंघन होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. वरळी हा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे ‘मनसे’कडून वरळीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. (John Abraham and Disha Patani spotted in Mumbai shooting for Ek Villain Returns)

अशातच आता एका बॉलीवूड चित्रपटाच्या शुटिंगवेळी वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या नियमांना मूठमाती देण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. या शुटिंगसाठी अभिनेता जॉन अब्राहम आणि दिशा पटानी (Disha Patani) वरळी कोळीवाड्यात आले होते. या सर्व कलाकारांनी मास्क न घातल्याचा आरोप, मनसेचे नेते संतोष धुरी यांनी केला.

आदित्य ठाकरे यांची बॉलीवूमधील अनेक कलाकारांशी चांगली मैत्री आहे. अभिनेत्री दिशा पटानी हिच्याशी असलेली आदित्य ठाकरे यांची मैत्री हा तर विशेष चर्चेचा विषय आहे. मध्यंतरी आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकत्र डिनरलाही गेले होते. यावरुन तेव्हा बऱ्याच चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे आता वरळी कोळीवाड्यातील दिशा पटानीच्या चित्रपटाचे शुटिंग हा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

कलाकारांनी मास्क घातले नाहीत, मनसेचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) काही व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. मनसेचे नेते संतोष धुरी यांच्या दाव्यानुसार, वरळी कोळीवाड्यात शुक्रवारी रात्री उशीरा एका चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. यावेळी जॉन अब्राहम आणि दिशा पटानी त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र, एकाही कलाकाराने तोंडावर मास्क घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नव्हते, असे संतोष धुरी यांनी सांगितले.

वरळीतील पब आणि बारवर कारवाई करणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

काही दिवसांपूर्वी वरळीतील नाईट क्लबमध्ये तुफान गर्दीमध्ये कोरोनाचे सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टीच आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हा मुद्दाही ‘मनसेने’च उजेडात आणला होता. त्यानंतर विधानसभेत यावरुन बराच गदारोळही झाला होता. या सगळ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या नाईट क्लबवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते.

वरळीतील प्रकारावर देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथं त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस

अजित पवार क्यूँ डरते है? देवेंद्र फडणवीसांनी हत्यार उपसलं

(John Abraham and Disha Patani spotted in Mumbai shooting for Ek Villain Returns)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.