‘दयाबेन’ कोट्यवधी संपत्तीची मालकीण, मालिकेपासून दूर असूनही अभिनेत्री…
दिशा वकानी हिने मॅटरनिटी लीव्ह घेतलीये. मात्र, दिशा वकानी ही मालिकेत परत कधी येणार हे कोणालाही माहिती नाहीये. दिशा वकानी अर्थात दयाबेनच्या पुनरागमनाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जरी दिशा वकानी ही मालिकेपासून दूर असली तरीही अभिनेत्री मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. मुळात म्हणजे या मालिकेचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. घरातील जवळपास सर्वच सदस्यांना ही मालिका आवडते. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकार गेल्या काही वर्षांपासून मालिकेला सोडचिठ्ठी देऊन जाताना दिसत आहेत. हेच नाही तर तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी तर थेट मालिकेच्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोपही केले. जेनिफर हिने देखील आरोप केले. आता जुने कलाकार सोडून जरी गेले असतील तरीही प्रेक्षक मालिकेला प्रेम देताना दिसत आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात दिशा वकानी ही देखील मालिकेपासून काही दिवसांपासून दूर आहे. मात्र, दिशा वकानी हिने मालिका सोडली नाहीये. मात्र, दयाबेन वापस कधी येणार यावर मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी हे देखील उत्तर देऊ शकत नाहीयेत. 2017 पासून दिशा वकानी ही मालिकेपासून दूर आहे.
दिशा वकानी हिने मॅटरनिटी लीव्ह घेतलीये. मात्र, दिशा वकानी ही मालिकेत परत कधी येणार हे कोणालाही माहिती नाहीये. दिशा वकानी अर्थात दयाबेनच्या पुनरागमनाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जरी दिशा वकानी ही मालिकेपासून दूर असली तरीही अभिनेत्री मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. दिशा वकानी ही एका एपिसोडसाठी तब्बल एक ते दीड लाख फीस आकारत.
टीव्हीच्या महागड्या अभिनेत्रींपैकी दिशा वकानी ही एक आहे. रिपोर्टनुसार दिशा वकानी ही 37 कोटी संपत्तीची मालकीन आहे. टप्पू के पापा…टप्पू के पापा…हे दिशा वकानी हिच्या तोंडून ऐकण्यासाठी चाहते आतुर आहेत. दिशा वकानी ही तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत जेठालालच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे दिशा वकानीची स्टाईल लोकांना प्रचंड आवडते.
मध्यंतरी चर्चा होती की, दयाबेनचे पात्र आता शिल्पा शिंदे ही साकारणार आहे. मात्र, असित कुमार मोदी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, आम्ही अजूनही दिशा वकानी हिची वाट पाहात आहे. आम्ही दिशा वकानीला पुनरागमनासाठी फोर्स नाही करू शकत. आमची इच्छा आहे की, दिशाने तिच्या कुटुंबाला वेळ द्यावा आणि मालिकेत यावे. कारण लोक दयाबेनची आतुरतेने वाट पाहात आहेत.
