
अभिनेत्री मोनालिसाने फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर टीव्हीच्या जगातही स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

मोनालिसा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. विशेष म्हणजे मोनालिसाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

मोनालिसा जास्त करून सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर गुलाबी स्लीव्हलेस सिल्क ड्रेसमधील तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

विशेष म्हणजे मोनालिसाच्या चाहत्यांना तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसवरील फोटो प्रचंड आवडल्याचे दिसते असून या ड्रेसमध्ये मोनालिसाचा लूक जबरदस्त दिसतोयं.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.