तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा नव्या हिरोईनच्या प्रेमात? चर्चांना उधाण!
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांच्या प्रेमात होते. आता मात्र त्यांचे ब्रेकअप झाले आहे. आता विजय वर्मा नव्या तरुणीच्या प्रेमात पडल्याचं सांगितलं जातंय.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता विजय वर्मा आणि लाखोंनी चाहते असलेली तमन्ना भाटिया अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. आता मात्र त्यांचं ब्रेकअप झालं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विजय वर्माचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडले जात होते. आता मात्र विजय वर्मा एका खास अभिनेत्रीला डेट करत असल्याचा दावा केला जातोय. तमन्नापासून वेगळं झाल्यानंतर विजय वर्मा आणि ती अभिनेत्री एकमेकांच्या जवळ आल्याचं बोललं जातंय.
दंगल गर्लच्या पडला प्रेमात?
रिपोर्टननुसार तमन्ना भाटियापासून वेगळं झाल्यानंतर आता विजय वर्मा एका नव्या सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला आहे. विशेष म्हणजे ही तरुणीदेखील बॉलिवूडमध्ये मोठी अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आणि विजय वर्मा दोघेही लपून-छपून फिरायला जात असल्याचं सांगितलं जातं. ही अभनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून दंगल चित्रपटातली फातिमा सना शेख ही आहे. फातिमा आणि विजय वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. पण विजय आणि फातिमा यांनी मात्र या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दोघेही करत आहेत सोबत काम
विशेष म्हणजे विजय वर्मा आणि फातिमा हे दोघेही गुस्ताख इश्क या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टरही समोर आले आहे. फातिमाला विजय वर्मा याच्याबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर बोलताना विजय एक चांगला अभिनेता आहे. तुम्ही चांगले अभिनेते असाल तर तुम्ही तुमचा मार्ग तयार करताच. तुम्हाला यश मिळण्यास कमी-अधिक वेळ लागू शकतो. पण उत्तम अभिनेता असलेल्या व्यक्तीला यश मिळतेच. विजय हा एक उत्तम अभिनेता आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत त्याला वेगळी ओळख मिळत आहे. हे बघून मला फार आनंद होतो, अशी प्रतिक्रिया फातिमाने दिली होती.
तमन्ना भाटियाशी कधी ब्रेकअप झालं?
दरम्यान, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. लस्ट स्टोरीच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगदरम्यान या दोघांची भेट झाली. या वेब सिरीजमध्ये दोघांनीही बोल्ड सिन दिलेले आहेत. मार्च 2025 मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्या ब्रेकअपचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
