टायगरच्या ‘गणपथ’ची स्क्रिप्ट ऐकताच नोरा फतेहीने तडक नाकारला चित्रपट, जाणून घ्या नेमकं कारण…

नोराला टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या 'गणपथ' (Ganpath) या चित्रपटात एका भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, नोराने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.

टायगरच्या ‘गणपथ’ची स्क्रिप्ट ऐकताच नोरा फतेहीने तडक नाकारला चित्रपट, जाणून घ्या नेमकं कारण...
टायगर-नोरा
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 8:14 AM

मुंबई : बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. तिने आपल्या नृत्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच अशी बातमी आली आहे की, नोराला टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या ‘गणपथ’ (Ganpath) या चित्रपटात एका भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, नोराने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने हा चित्रपट कधीही साइन केला नव्हता. या चित्रपटातील तिचे पात्र ऐकल्यानंतर तडक तिने ते नाकारले (After hearing the script of Tiger’s ‘Ganapath’, Nora Fateh rejected the film).

बातमीनुसार नोराने या चित्रपटाची कथा ऐकताच हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. बर्‍याच वर्षांच्या मेहनतीनंतर नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. जिथे आज प्रेक्षक तिला तिच्या नावाने ओळखतात. ज्यामुळे अभिनेत्री तिचे आगामी प्रोजेक्ट अत्यंत सावधगिरीने निवडत आहे, यामुळेच तिने टायगर श्रॉफचा हा चित्रपट करण्यास त्वरित नकार दिला. चित्रपटाची कहाणी ऐकल्यानंतर नोराला समजले की, या चित्रपटात तिच्या पात्राचे फारसे काम नाही. ज्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला आहे. या चित्रपटाशी नोराचे नाव जोडण्यात काही अर्थ नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कारण, तिने आधीच हा चित्रपट नाकारला आहे.

नोरा फतेहीला मोठ्या मोठ्या ऑफर्स

सध्या नोरा फतेही ही टी-सीरिजसह म्युझिक व्हिडीओंमध्ये जोरदार काम करत आहेत. यासोबतच ती लवकरच ‘भुज’ चित्रपटात अजय देवगन, संजय दत्तसोबत दिसणार आहे. यासह नुकतेच तिने जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटातही काम केले आहे.

नोरा फतेही शोधतेय मोठे काम

सोशल मीडियावर आपली मजबूत ओळख निर्माण झाल्यानंतर नोरा फतेही सध्या मोठ्या प्रकल्पांच्या शोधात व्यस्त आहे. तिला एक मोठी ऑफर मिळावी, अशी नोराची इच्छा आहे. ज्याच्या मदतीने ती तिच्या नृत्याशिवाय आपल्या अभिनयाची कौशल्ये देखील प्रेक्षकांसमोर मांडू शकते. नोराने दक्षिणच्या बड्या चित्रपटांसह अभिनयाच्या जगतात प्रवेश केला आहे. त्यानंतर तिने टी-सीरीजच्या अनेक बड्या म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केले आहे. असे म्हटले जाते की, नोरा टी-सीरीजची सर्वात पहिली पसंती आहे. नुकतेच तिने टी-सीरीजच्या संयुक्त विद्यमाने प्रतिक गांधी याच्याबरोबर एक गाणे शूट केले आहे. जे लवकरच प्रदर्शित होऊ शकते.

(After hearing the script of Tiger’s ‘Ganapath’, Nora Fateh rejected the film)

हेही वाचा :

PHOTO | कोरोनाकाळात हास्यथेरपी, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सन्मान!

क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर शेअर केला ‘मिमि’चा लूक, चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.