AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PS2 | ऐश्वर्या राय हिने केली सलमान खान याच्यावर मात, वाचा नेमके काय घडले?

सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सलमान खान याच्या या चित्रपटातून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, म्हणाला तसा प्रतिसाद हा सलमान खान याच्या चित्रपटाला चाहत्यांच्या प्रतिसाद मिळाला नाही.

PS2 | ऐश्वर्या राय हिने केली सलमान खान याच्यावर मात, वाचा नेमके काय घडले?
| Updated on: May 02, 2023 | 3:03 PM
Share

मुंबई : किसी का भाई किसी की जान हा सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाच्या माध्यमातून शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, म्हणावी तशी धमाल या चित्रपटाला करण्यात यश मिळाले नाही. शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची एक झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. तेंव्हापासूनच चाहते हे सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी रिलीज झाला.

सध्या फक्त सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हाच चित्रपट नाही तर बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा पोन्नियिन सेल्वन-2 हा चित्रपट देखील रिलीज झालाय. ऐश्वर्या राय हिच्या पोन्नियिन सेल्वन-2 चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे साऊथमध्ये हा चित्रपट तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहे.

सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने आतापर्यंत 174 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. चित्रपट 200 कोटींचा आकडा हा पुढील काही दिवसांमध्ये पार करेल असा अंदाजा आहे. भारतामध्ये किसी का भाई किसी की जान चित्रपटाने आतापर्यंत 105 कोटींचे कलेक्शन केले.

विशेष म्हणजे कमाईमध्ये ऐश्वर्या राय हिच्या पोन्नियिन सेल्वन-2 चित्रपटाने किसी का भाई किसी की जान या चित्रपटाला मागे टाकले आहे. जगभरातून पोन्नियिन सेल्वन-2 चित्रपटाने 212.35 कोटीचे कलेक्शन केले आहे. पोन्नियिन सेल्वन-2 चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी 500 कोटींचे बजेट लागले आहेत. कमाईमध्ये सलमान खान याच्या चित्रपटाला ऐश्वर्या राय हिच्या चित्रपटाने धूळ चारलीये.

सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळत होती. किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा बिग बजेटचा चित्रपट आहे. मात्र, म्हणावी तशी कामगिरी करण्यात चित्रपटाला यश मिळाले नाहीये.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?