पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘त्या’ विधानावर बोलताना अक्षय कुमार याने केले अत्यंत मोठे विधान
दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत आहेत. बाॅलिवूडचे चित्रपट सतत फ्लाॅप जात आहेत. याचा फटका बाॅलिवूडला बसत आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून बॉयकॉट ट्रेंड हा बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांच्याविरोधात सुरू आहे. याचा मोठ्या प्रमाणात फटका हा बाॅलिवूड चित्रपटांना बसताना देखील दिसतोय. बॉयकॉट ट्रेंडमुळे (Boycott trend) बाॅलिवूडचे चित्रपट बजेट देखील काढू शकत नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. बॉयकॉट ट्रेंडची सुरूवात चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर सुरू होते. मग चित्रपट प्रत्यक्षात रिलीज झाल्यावर याचा मोठा फटका बसतो. बॉयकॉट ट्रेंडमुळे गेल्या काही वर्षांपासून विशेष: कोरोनानंतर बाॅलिवूडला मोठा फटका बसत आहे. अत्यंत बिग बजेटचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत. दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत आहेत. बाॅलिवूडचे चित्रपट सतत फ्लाॅप जात असल्याने निर्मात्यांनी देखील मोठा धसका घेतलाय.
बाॅलिवूडमधील अनेकांनी बॉयकॉट ट्रेंड विरोधात मोहिम सुरू केलीये. कारण बाॅलिवूड हा एक अत्यंत मोठा व्यवसाय असून अनेकांचे पोट चित्रपटांमुळे भरत असल्याने अशा मोहिमेचा फटका बसत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी चित्रपटांबाबत काही भाष्य करणे टाळण्याचा सल्ला दिला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, एक नेता आहे जो चित्रपटांवर भाष्य करतो…
त्यांनी चित्रपटांविषयी केलेले विधान दिवसभर टीव्हीवर सुरू असते. त्यांना वाटते की, ते नेते बनत आहेत. पार्टी अध्यक्ष जेपी नड्डाने देखील यावर त्यांना फोन केला होता. मात्र, तरीही ते ऐकण्यास तयार नाहीत.
काय गरज आहे प्रत्येक चित्रपटावर भाष्य करण्याची? आता मोदींच्या या विधानावर बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने मोठे विधान केले आहे.
अक्षय कुमार म्हणाला, चित्रपट तयार करण्यास खूप जास्त मेहनत लागती. आता देशातील सर्वात मोठे प्रभावशाली नेते नरेंद्र मोदी यांनी हे सांगितले आहे. त्यामुळे खरोखरच ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. प्रत्येकानेच त्यांचे ऐकायला हवे.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामुळे मोठा वाद सुरू आहे. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने या वादाला तोंड फुटले होते. यानंतर अनेकांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.
