AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील अक्षय कुमार याचा लूक पाहून नेटकरी संतापले

अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

'वेडात मराठे वीर दौडले सात'मधील अक्षय कुमार याचा लूक पाहून नेटकरी संतापले
| Updated on: Dec 06, 2022 | 5:10 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक व्हिडीओ शेअर केलाय. या चित्रपटाची शूटिंग आजपासून सुरू झालीये. मात्र, चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट वादामध्ये अडकलाय. महेश मांजरेकर हे या चित्रपटाला दिग्दर्शित करत आहेत. अक्षयने पोस्ट शेअर करताना लिहिले की, आजपासून म्हणजेच 6 डिसेंबरपासून वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. शिवाजी महाराज यांची भूमिका करण्याचे साैभाग्य मला भेटले. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने मी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे अक्षयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अक्षयने शेअर केलेला त्याचा फर्स्ट लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. चाहते यावर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अक्षय कुमारच्या या फस्ट लूक व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे. एका युजर्सने कमेंट करत म्हटले आहे की, अक्षय कुमार हा शिवाजी महाराज यांची भूमिका करण्यास परफेक्ट नाहीये.

दुसऱ्या युजर्सने लिहिले की, हाच शिवाजी महाराज बनणार….हाच पृथ्वीराज बनणार…आणि अभिनय मात्र हाऊसफुल वाला करणार…हाच बाला देखील बनणार…बाॅलिवूडकडे दुसरे अभिनेतेच नाहीत…

इतकेच नाही तर अनेक युजर्स हे सोशल मीडियावर रडणारे इमोजी देखील शेअर करताना दिसत आहेत. अक्षय कुमार याने सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारचे यंदाच्या वर्षी तब्बल 5 चित्रपट रिलीज झाले. मात्र, एकाही चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करता आला नाही. अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी एका चित्रपटाची घोषणा देखील केली होती.

महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.