Ram Setu: राम सेतू चित्रपटावरून वाद; सुब्रमण्यम स्वामींनी केली अक्षय कुमारच्या अटकेची मागणी

भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नुकसान भरपाईची मागणी करत गुन्हा दाखल करणार आहेत. चित्रपटात 'राम सेतू'चा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Ram Setu: राम सेतू चित्रपटावरून वाद; सुब्रमण्यम स्वामींनी केली अक्षय कुमारच्या अटकेची मागणी
Ram Setu: राम सेतू चित्रपटावरून वाद
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 29, 2022 | 11:29 AM

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘राम सेतू’ (Ram Setu) हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला आता कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागणार आहे. अक्षय कुमारवर गुन्हा दाखल होणार असल्याची बातमी समोर येत आहे. भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नुकसान भरपाईची मागणी करत गुन्हा दाखल करणार आहेत. चित्रपटात ‘राम सेतू’चा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. खुद्द सुब्रमण्यम स्वामी यांनीच खटला दाखल केल्याची माहिती दिली आहे.

अक्षय कुमारविरोधात गुन्हा दाखल होणार

भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी हे अक्षय कुमार विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. चित्रपटात राम सेतूचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तथ्यांशी छेडछाड केल्याचा त्यांचा दावा आहे. आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामींनी लिहिलं, ‘माझे सहकारी अधिवक्ता सत्य सब्रवाल यांनी भरपाईचं प्रकरण अंतिम केलं आहे. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडिया यांच्याविरोधात त्यांच्या चित्रपटातील राम सेतू प्रकरणाच्या चुकीच्या चित्रणामुळे झालेल्या नुकसानीसाठी दावा दाखल करत आहे.’ सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्विट करत लिहिलं, ‘जर अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर आम्ही त्याला अटक करून त्याच्या दत्तक देशातून बाहेर काढण्यास सांगू शकतो.’

काही महिन्यांपूर्वी पोस्टर झालं होतं व्हायरल

एप्रिल महिन्यात राम सेतू चित्रपटाचं पोस्टर व्हायरल झालं होतं. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन आणि सत्यदेव दिसत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हे तिन्ही कलाकार एका ऐतिहासिक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे तिघे एका गुहेच्या आत दिसतात, ज्याच्या भिंतीवर एक विचित्र खूण आहे.

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षी 2022 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. अक्षय कुमारचा आगामी ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें