AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt: “जर तुम्हाला मी आवडत नसेन, तर माझे चित्रपट पाहू नका”; घराणेशाहीच्या टीकांवर आलिया भट्टचं रोखठोक मत

"या जगात येणाऱ्या माझ्या बाळाला जरी अभिनयात करिअर करायचं असेल तर मी त्याला सांगेन की तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि गोष्टी अजिबात सोप्या नसतील", असं ती पुढे म्हणाली.

Alia Bhatt: जर तुम्हाला मी आवडत नसेन, तर माझे चित्रपट पाहू नका; घराणेशाहीच्या टीकांवर आलिया भट्टचं रोखठोक मत
Alia BhattImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 23, 2022 | 10:05 AM
Share

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या करिअरच्या सुरुवातीला आलियाला घराणेशाहीच्या (nepotism) टीकांचा सामना करावा लागला. मात्र उत्कृष्ट व्यक्तीरेखा साकारत तिने आपली प्रतिभा प्रेक्षकांसमोर सादर केली. त्यामुळे जर कोणाला मी आवडत नसेन, तर त्याने माझे चित्रपट पाहू नये, असं तिने थेट म्हटलंय. बॉलिवूडबाबत असलेली नकारात्मकता आणि घराणेशाहीचा वाद याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. “ट्रोलिंग (criticisms) आणि नेपोटिझमचा सामना करण्याचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक म्हणजे मी माझी प्रतिभा सादर करून त्यांना गप्प करू शकते. माझ्या चित्रपटांनीच मी या वादाला पूर्णविराम लावू शकते असं मला वाटतं”, असं आलिया ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

“अशा ट्रोलिंगला उत्तर देऊ नका आणि त्याविषयी वाईटही वाटून घेऊ नका. मला नक्कीच वाईट वाटतं. पण तुम्हाला जे काम आवडतं आणि ज्याचा तुम्ही सन्मान करता, त्याबद्दल वाईट वाटून घेणं ही खूपच छोटी गोष्ट आहे. अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करून माझं काम करत राहते. मी गंगुबाई काठियावाडीसारखा चित्रपट केला आहे. त्यामुळे आता कोण हसतंय? किमान मी माझा फ्लॉप चित्रपट देईपर्यंत तरी. सध्या तरी मीच हसतेय. दिवसाअखेर तेच हास्य तुमच्या कामात वापरा. मी शाब्दिकदृष्ट्या सतत माझा बचाव करू शकत नाही. जर तुम्हाला मी आवडत नसेन तर माझे चित्रपट पाहू नका. मी त्याबाबत काहीच करू शकत नाही. किंबहुना हे माझ्या हातातच नाही. लोकांना नेहमीच काही ना काही बोलायचं असतं. त्यामुळे या इंडस्ट्रीत माझा हक्क आहे, हे मी माझ्या चित्रपटांमधूनच सिद्ध करू शकते. मी कुठे जन्माला आले, माझे आई-वडील कोण असतील, या गोष्टी माझ्या नियंत्रणातील नाहीत. माझ्या वडिलांनी जी मेहनत केली, त्यासाठी तुम्हाला मला वाईट वाटू द्यायचं असतं. मला पहिली संधी नक्कीच सोप्या पद्धतीने मिळाली. पण आज मी जे काही आहे, त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. या जगात येणाऱ्या माझ्या बाळाला जरी अभिनयात करिअर करायचं असेल तर मी त्याला सांगेन की तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि गोष्टी अजिबात सोप्या नसतील”, असं ती पुढे म्हणाली.

आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यामध्ये तिच्यासोबत शेफाली शाह आणि विजय वर्मा यांनीसुद्धा भूमिका साकारल्या आहेत. जसमीत के. रीन दिग्दर्शित या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक झालं. आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.