पान मसाला ब्रँडपासून अमिताभ बच्चन यांची फारकत, मानधनाचे पैसे परत करत रद्द केला जाहिरात करार!

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) अनेक जाहिराती करतात. त्यांचे चाहतेही त्यांच्या जाहिरातींनी खूप प्रभावित झाले आहेत. अलीकडेच बिग बींनी एका पान मसाला ब्रँडची जाहिरात केली होती. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आले.

पान मसाला ब्रँडपासून अमिताभ बच्चन यांची फारकत, मानधनाचे पैसे परत करत रद्द केला जाहिरात करार!
Amitabh Bachchan

मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) अनेक जाहिराती करतात. त्यांचे चाहतेही त्यांच्या जाहिरातींनी खूप प्रभावित झाले आहेत. अलीकडेच बिग बींनी एका पान मसाला ब्रँडची जाहिरात केली होती. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आले. आता ‘बिग बीं’नी या पान मसाला ब्रँडसोबतचा करार रद्द केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी अधिकृत निवेदन जारी करून या ब्रँडसोबतचा त्यांचा करार रद्द करण्याची माहिती दिली आहे. या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, बिग बींनी या ब्रँडपासून स्वतःला दूर केले आहे. कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी, अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि त्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

परत केले मानधन!

असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा अमिताभ बच्चन या ब्रँडशी संबंधित होते, तेव्हा त्यांना माहित नव्हते की हे सरोगेट जाहिरातीखाली आले आहे. त्यांनी आता त्यांचा करार लेखी संपुष्टात आणला आहे आणि ब्रँडच्या जाहिरातीसाठी त्यांना देऊ केलेली फी देखील परत केली आहे.

काही काळापूर्वी राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांना एक पत्र लिहिले होते, ज्यात असे म्हटले होते की, पान मसाला लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यात असेही लिहिले होते की, बिग बी पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, त्यांनी ही अशी जाहिरात त्वरित सोडली पाहिजे.

चाहत्याने विचारला प्रश्न

गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका चाहत्याला विचारले होते की, त्यांनी या ब्रँडला पाठींबा देण्याचे काम का निवडले? त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, मी माफी मागतो. जर कोणी कोणत्याही व्यवसायात चांगले करत असेल, तर आपण त्याच्याशी का संबंध ठेवत आहोत याचा विचार करू नये. होय, जर एखादा व्यवसाय असेल, तर त्यामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाचाही विचार करावा लागेल. आता तुम्हाला असे वाटते की, मी हे करायला नको होते. पण हो मला हे करून पैसे मिळतात आणि असे बरेच लोक आहेत जे आमच्या क्षेत्रात असं काम करत आहेत.

वाढदिवसानिमित्ताने स्वतःसाठी पोस्ट

बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज (11 ऑक्टोबर) आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी प्रयागराजमध्ये झाला. दरवर्षी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. दरवर्षी त्यांचे घर ‘जलसा’ बाहेर चाहते जमतात. बिग बींनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे, पण त्यात त्यांनी चूक केली आहे.

बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन चालत असताना कुठेतरी जात आहेत. फोटोमध्ये ते राखाडी जॅकेट, ट्राउजर आणि स्लिंग बॅग घेऊन जाताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, मी 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे.

मुलगी श्वेताने सांगितले योग्य वय

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर त्यांची मुलगी श्वेता यांनी लगेच कमेंट केली आहे. तिने वडिलांना त्यांचे अचूक वय- 79 लिहून लिहिले, यासोबतच त्यांनी एक इमोजी पोस्ट केला.

हेही वाचा :

एकाच रंगाचे कपडे घालून विक्की कौशल, कतरिना ‘सरदार उधम’च्या स्क्रीनिंगला, चाहते म्हणतात, आता तरी प्रेमाची कबुली द्या!

Happy Birthday Amitabh Bachchan | कठीण काळात मेहमूद यांनी अमिताभ बच्चनला दिली साथ, ‘या’ कारणामुळे नात्यात आला दुरावा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI