AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकअपनंतर चक्क मिस्ट्री मॅनसोबत रोमांटिक होताना दिसली अनन्या पांडे, ‘तो’ फोटो व्हायरल

अनन्या पांडे हिचे अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये अनन्या पांडे ही प्रियांका चोप्रा आणि निक जोनस याच्यासोबत डान्स करताना देखील दिसत आहे. मात्र, यावेळी अनन्या पांडे हिच्याकडून असे काहीतरी होते की, ज्यानंतर अनन्या पांडे हिच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

ब्रेकअपनंतर चक्क मिस्ट्री मॅनसोबत रोमांटिक होताना दिसली अनन्या पांडे, 'तो' फोटो व्हायरल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 13, 2024 | 10:21 PM
Share

मुंबई : चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही सातत्याने चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनन्या पांडे दिसते. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने मुंबईमध्ये अलिशान असा फ्लॅट खरेदी केला. आपल्या घराची झलक दाखवताना अनन्या पांडे ही दिसली. अनन्या पांडेचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट फ्लॉप झाला. अनन्या पांडे हिच्यावरच याचे खापर फोडले गेले. अनन्या पांडे ही काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुराना याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. मात्र, यांचा जोडीला लोकांना फार काही पसंती दिसली नाही.

अनन्या पांडे ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप काही दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजूनही अनन्या पांडे किंवा आदित्य रॉय कपूर यांनी त्यांच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केले नाहीये. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. विदेशाही खास वेळ घालवताना दोघे दिसले होते.

View this post on Instagram

A post shared by Walker (@walker_blanco)

अनन्या पांडे ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना दिसली. मात्र, अनन्या पांडे हिचा लग्नातील एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये अनन्या पांडे हिच्यासोबत कोणीतरी मिस्ट्री मॅन दिसत आहे. मिस्ट्री मॅनसोबतचा अनन्या फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीसोबत रोमांटिक होताना अनन्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या फोटोनंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. याच मिस्ट्री मॅनला अनन्या पांडे ही डेट करत असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे हा मिस्ट्री मॅन अमेरिकन आहे. म्हणजेच काय तर आता आदित्य रॉय कपूर याला विसरून अनन्या पांडे ही आयुष्यात पुढे गेल्याचे दिसत आहे. हा फोटो आता चांगलाच चर्चेत येताना दिसत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना