Anushka Sharma Tea Controversy | ‘अनुष्का शर्माला चहा सर्व्ह केला’, फारुख इंजिनिअर यांच्या वक्तव्यावर दोन वर्षांनी एमएसके प्रसाद यांची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले…

| Updated on: Jun 15, 2021 | 2:38 PM

अनुष्काला चहा देण्याच्या मुद्यावरून हा वाद सुरू झाला होता. 2019 विश्वचषक स्पर्धेदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू फारूक इंजिनिअर यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले होते. फारुख यांनी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या निवड समितीला ‘मिकी माऊस निवड समिती’ म्हटले होते.

Anushka Sharma Tea Controversy | ‘अनुष्का शर्माला चहा सर्व्ह केला’, फारुख इंजिनिअर यांच्या वक्तव्यावर दोन वर्षांनी एमएसके प्रसाद यांची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले...
एमएसके प्रसाद आणि अनुष्का
Follow us on

मुंबई : 2016 ते 2020 या काळात एमएसके प्रसाद (MSK Prasad) भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता होते. प्रसाद यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटमधील अनेक वाद समोर आले होते. महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीचा वादही त्यापैकीच एक होता. पण एक गोष्ट जी बरीच चर्चेत आली होती, ती भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिशी संबंधित आहे (Anushka Sharma Tea Controversy MSK Prasad breaks silence after 2 years).

तब्बल दोन वर्षानंतर आता प्रसाद यांनी अखेर त्या घटनेविषयी मौन सोडले आहे. अनुष्काला चहा देण्याच्या मुद्यावरून हा वाद सुरू झाला होता. 2019 विश्वचषक स्पर्धेदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू फारूक इंजिनिअर यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले होते. फारुख यांनी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या निवड समितीला ‘मिकी माऊस निवड समिती’ म्हटले होते. फारुख यांनी निवडकर्त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून म्हटले होते की, 2019च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान निवडकर्ते अनुष्का शर्माला चहा देण्यात व्यस्त होते.

अनुष्का झाली नाराज

फारुख यांच्या या वक्तव्यानंतर अनुष्काला खूप वाईट वाटले होते आणि तिने सोशल मीडियावर याविषयी स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र, त्यावेळी एमएसके प्रसाद यांनी चुप्पी साधणे सोयीस्कर समजले होते. मात्र, आता 2 वर्षानंतर त्यांनी यावरील मौन सोडले आहे.

काय म्हणाले एमएसके प्रसाद?

आता प्रसाद यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे काम खूप कठीण आहे. आपल्या यशाचे श्रेय आपल्याला क्वचितच मिळते. आपल्या संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी किंवा त्यांच्या खराब कामगिरीमुळे वगळण्यासाठी आपल्याला बरीच टीका सहन करावी लागत असते. अनुष्का प्रकरणाबाबत निवड समितीला विनाकारण वादात ओढले गेले. पण, जेव्हा स्टार खेळाडूंशिवाय देखील टीमने ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली, तेव्हा निवड समितीला कुणीही श्रेय दिले नाही. संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या कौतुकामुळे समाधान मिळते. बाहेरील लोकांना ते माहित असो वा नसो, परंतु आम्ही काय केले ते आतील लोकांना माहित आहे.’

(Anushka Sharma Tea Controversy MSK Prasad breaks silence after 2 years)

हेही वाचा :

Bellbottom | अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘बेलबॉटम’ चित्रपट

Photo : सनी लिओनीच्या न्यूड फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा, हा हटके फोटो पाहिलात का?