Bellbottom | अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘बेलबॉटम’ चित्रपट

खिलाडी कुमारचे चाहते बर्‍याच दिवसांपासून अभिनेत्याच्या नवीन फिल्म ‘बेलबॉटम’ची प्रतीक्षा करत होते. ही प्रतीक्षा आता संपली आहे. अक्षयचा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Bellbottom | अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘बेलबॉटम’ चित्रपट
अक्षय कुमार

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. चाहत्यांना त्याच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा असते. अशा परिस्थितीत, आता अक्षयच्या चाहत्यांसाठी एक मोठी चांगली बातमी समोर आली आहे. खिलाडी कुमारचे चाहते बर्‍याच दिवसांपासून अभिनेत्याच्या नवीन फिल्म ‘बेलबॉटम’ची प्रतीक्षा करत होते. ही प्रतीक्षा आता संपली आहे. अक्षयचा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे (Akshay Kumar revealed his upcoming film bellbottom release date).

अक्षय हा पहिला असा अभिनेता आहे, ज्याचा ‘बेलब़ॉटम’ (Bellbottom) हा चित्रपट लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना त्याची एक झलक रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल. हा चित्रपट 27 जुलै 2021 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

‘बेलबॉटम’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

अक्षय कुमारने स्वत: चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्याचा आगामी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. अभिनेत्याने सांगितले की, ‘मला माहित आहे की, बेलबॉटमच्या प्रदर्शनासाठी तुम्ही खूप वात पाहत आहात. पण आता आम्हाला आमच्या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे…जगभरात प्रदर्शित होतोय 27 जुलैला…’

अक्षयच्या या घोषणेने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. बऱ्याच काळापासून अक्षयचा कोणताही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेला नाही. अशा परिस्थितीत, बेलबॉटम आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता अक्षयच्या चित्रपटाच्यानिमित्ताने चाहते थिएटरमध्ये येतील. या चित्रपटात अक्षय कुमार एका नव्या अवतारात दिसणार आहे.

पाहा अक्षयची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटाचे शूटिंग बर्‍याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. गेल्या वेळी लॉकडाऊननंतरच अक्षयने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. तेव्हापासून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी वाट पाहत आहे. अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, बेलबॉटमसाठी आपली फी 30 कोटींपेक्षा कमी करण्यास अक्षयने मान्यता दिली आहे. पण, अक्षयने या बातमीला अफवा म्हटले होते.

चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट 1980च्या दशकावर आधारित असून, यात खिलाडी कुमार रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या लूकमध्ये तो खूप डॅशिंग दिसत आहे. टीझरमध्ये अक्षय वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला होता. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसेन हे कलाकार दिसणार आहेत.

(Akshay Kumar revealed his upcoming film bellbottom release date)

हेही वाचा :

सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहायचंय? जाणून घ्या भाड्यासाठी किती पैसे मोजावे लागतील…

Photo : ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम करण कुंद्राच्या एक्स गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार, स्विमिंग पूलमधील फोटो शेअर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI