सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहायचंय? जाणून घ्या भाड्यासाठी किती पैसे मोजावे लागतील…

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा ‘मॉन्ट ब्लँक’ अपार्टमेंटमधील फ्लॅट हा तपासणीचा एक भाग बनला होता आणि एजन्सीचे अधिकारी तिथे सतत तपासणीसाठी येत असत. आता ही अपार्टमेंट पुन्हा भाड्याने देण्यासाठी तयार आहे आणि नव्या भाडेकरूची वाट पहात आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहायचंय? जाणून घ्या भाड्यासाठी किती पैसे मोजावे लागतील...
सुशांत सिंह राजपूत
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 12:10 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरात मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा ‘मॉन्ट ब्लँक’ अपार्टमेंटमधील फ्लॅट हा तपासणीचा एक भाग बनला होता आणि एजन्सीचे अधिकारी तिथे सतत तपासणीसाठी येत असत. आता ही अपार्टमेंट पुन्हा भाड्याने देण्यासाठी तयार आहे आणि नव्या भाडेकरूची वाट पहात आहे. सुशांतचे हे घर खूपच सुंदर आहे. हा फ्लॅट सी व्ह्यू असून, दुसर्‍या मजल्यावर आहे (Sushant Singh Rajput Mount Blanc sea view apartment is ready for lease again know about rent).

एका सेलिब्रिटी ब्रोकरने सांगितले की, सुशांतची अपार्टमेंट पुन्हा एकदा लीजसाठी तयार आहे आणि नव्या भाडेकरू वाट पहात आहेत. ब्रोकरने असेही म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बरेच लोक हे घर पाहण्यासाठी येऊ शकलेले नाहीत. जरी कोणी आले, तरी ते सुशांत सिंह राजपूतबद्दल विचारणा करतात.

किती आहे सुशांतच्या घराचे भाडे?

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या अपार्टमेंटचे एका महिन्यासाठी भाडे तब्बल चार लाख रुपये आहे. ब्रोकर म्हणाले, हा एक सुंदर सी व्ह्यू अपार्टमेंट आहे आणि ते क्रिएटिव्ह माइंडच्या लोकांसाठी खूप चांगले आहे आणि जे कामासाठी मुंबईला येत आहेत, त्यांच्यासाठी ते परिपूर्ण आहे. ही महामारी लवकरच संपेल आणि मग सर्वकाही सुरळीत सुरू होईल, कदाचित लोकांना हे घर आवड वाढेल. रिअॅलिटी फर्मच्या अहवालानुसार या अपार्टमेंटच्या मालकास या घराला पुन्हा एकदा भाड्याने देण्यात काही अडचण नाही. कारण त्याला माहित आहे की, या फ्लॅटच्या लोकेशनमुळे नवीन भाडेकरू शक्य तितक्या लवकर अपार्टमेंटमध्ये येतील.

माध्यम वृत्तानुसार सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री रिया चक्रवर्ती, फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी आणि घरातील सहकारी नीरज आणि केशव या अपार्टमेंटमध्ये राहत होते. सुशांतने हे घर 2019 मध्ये भाड्याने घेतले होते, आणि डिसेंबर 2022 पर्यंत तो या घरात राहणार होता.

सुशांत या अपार्टमेंटचे भाडे 3 टप्प्यात देत असे, असेही अहवालात सांगण्यात आले. पहिल्या वर्षी तो दरमहा 4.3 लाख रुपये द्यायचा, दुसर्‍या वर्षी तो 4.51 लाख रुपये आणि तिसर्‍या वर्षी 4.74 लाख रुपये दरमहा देणार होता.

सिद्धार्थ पिठाणीने पाहिला अभिनेत्याचा मृतदेह!

या फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. त्याचा पंख्याला लटकलेला मृतदेह प्रथम त्याच्या मित्र सिद्धार्थ पिठाणी याने पहिला होता. इतकेच नव्हे तर, त्यानेच सुशांतचा मृतदेह पंख्यावरून खाली उतरवला होता. सध्या त्याची चौअक्षी सुरु असून, त्याला एनसीबीने अटक केली आहे.

(Sushant Singh Rajput Mount Blanc sea view apartment is ready for lease again know about rent)

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या निधनाला वर्ष पूर्ण, चौकशी अद्याप सुरु! CBI अधिकाऱ्यांकडून सुशांत प्रकारणाची अपडेट

Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते…’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.