Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते…’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

आज, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने अंकिताने एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अंकिताने सुशांतच्याखूप खास आठवणी आपल्या व्हिडीओमध्ये शेअर केल्या आहेत, हे पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत. अंकिताने सामायिक केलेल्या व्हिडीओमध्ये ती सुशांतसोबत दिसली आहे.

Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते...’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!
सुशांत-अंकिता

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आज (14 जून) एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षापूर्वी 14 जून रोजी अभिनेत्याने या जगाला निरोप दिला. 34 वर्षीय सुशांत त्याच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतचा मृत्यू त्याच्याशी संबंधित प्रत्येकासाठी एक मोठा धक्का होता. अशा परिस्थितीत आज सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने सर्वजण त्याचे स्मरण करत आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेही (Ankita Lokhande) या यादीत सामील झाली आहे (Sushant Singh Rajput Death Anniversary Ankita Lokhande share emotional video).

आज, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने अंकिताने एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अंकिताने सुशांतच्याखूप खास आठवणी आपल्या व्हिडीओमध्ये शेअर केल्या आहेत, हे पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत. अंकिताने सामायिक केलेल्या व्हिडीओमध्ये ती सुशांतसोबत दिसली आहे.

अंकिताने शेअर केला भावनिक व्हिडीओ

अंकिता लोखंडे यांनी व्हिडीओमध्ये स्वत:ची आणि सुशांतची प्रत्येक आठवण शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये अंकिता आणि सुशांतचे अनेक फोटो कोलाज केले आहेत. या फोटोंमध्ये कधीकधी दोघांचीही लव्हस्टोरी, तर कधी मजेदार अशी स्टाईल पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये सुशांत आणि अंकिताचा प्रत्येक क्षण हे दोघेही एकत्र राहत असल्याचे पाहायला मिळते. काही फोटोंमध्ये सुशांत एकटासुद्धा दिसत आहे. अंकिताचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

या व्हिडीओबरोबरच अंकिताने खूप भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले की ‘14 जून… हा आमचा प्रवास होता !!!! फिर मिलेंगे चलते चलते…’ सुशांतला समर्पित अंकिताचा हा सुंदर व्हिडीओ चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि यावर ते कमेंट्सही करत ​​आहेत.

सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि को-स्टार अंकिता लोखंडे हिलाही अभिनेत्याच्या मृत्यूने मोठा धक्का बसला होता. काळानुसार अंकिताने स्वत:ची काळजी घेतली आणि आता तिचे आयुष्य आता पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे. नुकतीच अंकिताने सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त घरी पूजा आयोजित केली होती.

अंकिता लोखंडे हिने सुशांत सिंह राजपूत याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त घरी यज्ञ-हवन केले होते. तिने त्याची झलक आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये, देवासमोर यज्ञ आणि दिवे प्रज्वलित होताना दिसत आहेत. अंकिता यापूर्वीही वेळोवेळी सुशांतच्या आठवणी शेअर करत होती.

(Sushant Singh Rajput Death Anniversary Ankita Lokhande share emotional video)

हेही वाचा :

Happy Birthday Kirron Kher | विवाहित असतानाही एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा किरण-अनुपम खेर यांची लव्हस्टोरी!

SSR Top 5 Movie | तो कधी ‘धोनी’ बनला, तर कधी ‘छिछोरे’, पाहा सुशांत सिंह राजपूतचे गाजलेले चित्रपट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI