Happy Birthday Kirron Kher | विवाहित असतानाही एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा किरण-अनुपम खेर यांची लव्हस्टोरी!

अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर यांची प्रेमकथा बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. जेव्हा, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. आपापल्या लग्नात नाखूष किरण आणि अनुपम खेर यांना एकमेकांमध्ये आनंद दिसला आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Happy Birthday Kirron Kher | विवाहित असतानाही एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा किरण-अनुपम खेर यांची लव्हस्टोरी!
अनुपम -किरण खेर
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 12:29 PM

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) आज (14 जून) आपला 69वा वाढदिवस साजरा करत आहे. किरण खेर यांचा जन्म 14 जून 1952 रोजी पंजाबमध्ये झाला होता. बॉलिवूडच्या आवडत्या आईबद्दल विचारले असता, प्रत्येकाच्या जिभेवर किरण खेर यांचे नाव येते. किरण खेर यांनी चित्रपटांसह अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. चित्रपटांमध्ये काम करतानाच किरण खेर अनुपम खेर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पतीशी घटस्फोट घेत अनुपम खेर यांच्याशी लग्न केले (Happy Birthday Kirron Kher know about kirron kher and anupam kher love story).

अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर यांची प्रेमकथा बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. जेव्हा, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. आपापल्या लग्नात नाखूष किरण आणि अनुपम खेर यांना एकमेकांमध्ये आनंद दिसला आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

थिएटरमध्ये झाली भेट

किरण आणि अनुपम यांची चंदीगडमधील थिएटर दरम्यान भेट झाली होती. तिथे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले. दोघांनाही एकमेकांबद्दल सर्व काही माहित होते, पण हे माहित नव्हते की ही मैत्री नंतर प्रेमात बदलणार आहे. आपले नशीब आजमावण्यासाठी किरण 1980 मध्ये मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांची भेट व्यावसायिक गौतम बेरीशी झाली आणि त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. दोघांचे लग्न झाले आणि त्यांना मुलगा झाला. किरण आणि गौतमच्या मुलाचे नाव ‘सिकंदर’ आहे.

गौतम आणि किरणचा प्रेम विवाह होता, पण या नात्यात त्या खुश नव्हत्या. त्यांनी आपले थिएटर चालू ठेवले. दुसरीकडे अनुपम खेर यांचेही लग्न झाले होते आणि तेही आपल्या लग्नात आनंदी नव्हते. लग्नामुळे त्रस्त अनुपम आणि किरण थिएटरमध्ये काम करत होते.

…आणि फुलू लागले प्रेमाचे नाते!

एकदा अनुपम खेर आणि किरण कोलकात्यात एका नाटकासाठी गेले होते. जिथे दोघांनाही पहिल्यांदा एकमेकांविषय प्रेम वाटले. त्यावेळी अनुपम माझ्या खोलीतून परत येत होते, त्यांनी माझ्याकडे पाहिले तेव्हा आम्हाला दोघांना काहीतरी खास वाटले, असे किरण खेर सांगतात.

अनुपम खेर यांनी दिला प्रस्ताव

प्रेमाची जाणीव झाल्यानंतर अनुपम खेरने मनातले बोलण्यात जास्त वेळ घालवला नाही. एक दिवस ते किरणच्या घरी गेले आणि त्यांना सांगितले की, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. तेव्हाच अनुपम यांनी किरणबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले. तेव्हाच दोघांची मैत्री प्रेमात बदलली.

किरणने तिचा नवरा आणि अनुपम खेर यांनी त्यांची पत्नी यांना घटस्फोट दिला आणि दोघांनी 1985मध्ये एकमेकांशी लग्न केले. अनुपम खेर यांनी आपले नाव किरण खेर यांच्या मुलाला दिले. सध्या किरण खेर रक्त कर्करोगाशी झुंज देत आहे. त्यांचा उपचार सुरु आहे. अनुपम खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर, किरण खेरच्या प्रकृतीविषयी चाहत्यांना अपडेट देत असतात.

(Happy Birthday Kirron Kher know about kirron kher and anupam kher love story)

हेही वाचा :

Photo : तारक मेहता…चा पोपटलाल प्रेमात पडलाय! पाहा कोण आहे ‘ही’ नवी मुलगी

छोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार ‘सा रे ग म प लिटील चॅम्प’, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.