Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या निधनाला वर्ष पूर्ण, चौकशी अद्याप सुरु! CBI अधिकाऱ्यांकडून सुशांत प्रकारणाची अपडेट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने गेल्या वर्षी 14 जूनला आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला होता. सीबीआय (CBI), एनसीबी (NCB) या संस्था सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. या प्रकरणात प्रत्येकजण नवीन अपडेटची वाट पाहत आहे

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या निधनाला वर्ष पूर्ण, चौकशी अद्याप सुरु! CBI अधिकाऱ्यांकडून सुशांत प्रकारणाची अपडेट
सुशांत सिंह राजपूत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने गेल्या वर्षी 14 जूनला आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला होता. सुशांत त्याच्या मुंबईतील घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या अशा अचानक निघून जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, ज्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. चाहते सतत सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी करत राहतात. सीबीआय (CBI), एनसीबी (NCB) या संस्था सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. या प्रकरणात प्रत्येकजण नवीन अपडेटची वाट पाहत आहे (Sushant Singh Rajput Case CBI share latest update of the case).

आज (14 जून) सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त सीबीआयने हे प्रकरण बंद केले नसल्याचे सांगितले आहे. वृत्तानुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवालानुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह राजपूत याचे प्रकरण बंद केल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे. तपास अद्याप सुरू आहे आणि आम्ही प्रत्येक अँगलने चौकशी करत आहोत, असे ही त्यांनी म्हटले आहे.

एनसीबीकडून सिद्धार्थ पिठाणीला अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने अनेक ड्रग पेडलर्सना अटक केली होती. यासह या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनाही अटक करण्यात आली होती. रिया जवळपास 1 महिन्यासाठी तुरूंगात होती, त्यानंतर तिला जामीन मिळाला. नुकतेच एनसीबीने या प्रकरणात सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणीला अटक केली आहे. सिद्धार्थ सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. सिद्धार्थला अटक झाल्यानंतर एनसीबीने सुशांतच्या नोकरांचीही चौकशी केली आहे.

रियाचे नवे वक्तव्य

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनेही एनसीबीकडे आपले निवेदन नोंदवले ते सध्या बरेच चर्चेत आले आहे. या निवेदनात रिया म्हणाली होती की, सुशांत तिला भेटण्यापूर्वी ड्रग्ज घेत असे आणि त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती होती. सुशांतच्या बहिणीने त्याला ड्रग्ज असलेली काही औषधे खाण्यास सांगितले होते, असा आरोप तिने सुशांतच्या कुटुंबावर केला होता. याच औषधांमुळे सुशांतचा मृत्यू होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते.

आज सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने त्याचे चाहते आणि मित्रपरिवार सुशांतचे स्मरण करत आहेत. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. भूमी पेडणेकर, संजना संघी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा या दिवशी सुशांतची आठवणी शेअर केल्या आहेत.

(Sushant Singh Rajput Case CBI share latest update of the case)

हेही वाचा :

Sanchari Vijay Road Accident | अपघातात गंभीर दुखापत, उपचारादरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे निधन

Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते…’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI