‘सावधान इंडिया’च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

सावधान इंडिया मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार इंडियाची मालिका सावधान इंडियाच्या दोन क्रू मेंबर्सचा रस्तावर अपघात झाल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला आहे.

'सावधान इंडिया'च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

दिल्ली :  सावधान इंडिया मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार इंडियाची मालिका सावधान इंडियाच्या दोन क्रू मेंबर्सचा रस्तावर अपघात झाल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. यापैकी एकाची ओळख सहायक आर्ट डायरेक्टर प्रमोद अशी आहे तर दुसर्‍या व्यक्ती सेटवर हेल्पर म्हणून काम करत होता. मात्र, अद्याप त्या व्यक्तीचे नाव समजून शकले नाही. हे दोघेही 20 तासांची शिफ्ट करून घरी जात होते आणि त्याचवेळी हा अपघात घडला आहे. (Art director of Sawdhan India series dies in an accident)

पण नेमका हा अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार प्रमोद शनिवारी पहाटे सावधान इंडिया मालिकेचे काम संपवून घरी जात होते. ते दुचाकीवरून घरी जात होते त्याच्यासोबत अजून एक क्रूमेंबर देखीलसोबत होता. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ते वाचू शकले नाहीत.

आर्ट डायरेक्टर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस दिलीप यांनी घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, आम्ही अशाप्रकारे प्रमोदला गमावले यावर विश्वासच बसत नाहीये हे फार वाईट आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता शूट सुरू झाले जे दुसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालले सकाळपर्यंत प्रमोदही तिथे होता.

20 तास सतत काम करणे ही एक मोठी गोष्ट आहे. कोणत्याही मानसाला इतक्या वेळ शिफ्ट केल्यावर थकवा तर येणारच मुळात म्हणजे 20 तास शिफ्ट लावणेच चूकीचे आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी सांगितले की, आपण चॅनेलला पत्र पाठवणार आहोत आणि त्यांच्याकडून 20 तासांच्या शिफ्टबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

संबंधित बातम्या : 

दोस्तांसाठी कायपण! वरुण धवनच्या पार्टीला मलायकापासून कियाराची हजेरी!

रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ मुंबई पोलिसांकडून ताब्यात, काय आहे प्रकरण?

Video | सोनू सूदने गावकऱ्यांची इच्छा केली पूर्ण म्हणाला, आता बोला!

(Art director of Sawdhan India series dies in an accident)

Published On - 10:19 am, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI