अशोक, फक्त पैसेच परत करतोय, वेळ नाही रे… नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांचा मन हेलावून टाकणारा किस्सा

अभिनेते नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील भावनिक मैत्रीची ही हृदयस्पर्शी कथा. नानांच्या आर्थिक अडचणीच्या काळात अशोक सराफ यांनी त्यांना खंबीर साथ दिली. पैसे नसताना अशोकने जाणूनबुजून पत्त्यात हरून मदत केली, कोरा चेक दिला. 'पैशे परत करतोय, वेळ नाही' हे नानांचे शब्द त्यांच्यातील अविस्मरणीय ऋणानुबंधाची साक्ष देतात.

अशोक, फक्त पैसेच परत करतोय, वेळ नाही रे... नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांचा मन हेलावून टाकणारा किस्सा
nana patekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 4:58 PM

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर हे अजातशत्रू होते. सिनेसृष्टीच नव्हे तर राजकारण आणि इतर क्षेत्रातही त्यांचा मित्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांना नाना गेले यावर विश्वासच बसत नाहीये. सर्वच मित्र नानांच्या आठवणींना उजळा देत आहेत. अभिनेते अशोक सराफही नाना पाटेकर यांच्या जाण्याने अस्वस्थ झाले आहेत. नाना पाटेकर गेले यावर विश्वासच बसत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांचा दोस्ताना जगजाहीर आहे. जेव्हा नाना पाटेकर यांचा पडताकाळ होता, त्यावेळी नानांना ज्या काही मित्रांनी खंबीर साथ दिली. त्यात अशोक सराफ हेही होते. नाना पाटेकर नेहमीच अशोक सराफ यांच्या मदतीची आठवण करायचे. नाना पाटेकर यांनी 1200 रुपयांची नोकरी सोडून नाटकात काम सुरू करण्यास सुरुवात केली होती. पण फारसे नाटकं वाट्याला येत नसायचे. मिळालेल्या नाटकातून फार मानधन मिळत नसायचं. त्यामुळे नाना पाटेकर यांना नेहमीच आर्थिक चणचणीला सामोरे जावं लागायचं.

Loading...

फक्त 50 रुपये मानधन

हमीदाबाईची कोठीचे प्रयोग असायचे. तेव्हा अशोक सराफ यांना 250 रुपये मानधन मिळायचं. कारण अशोक सराफ स्टार होते. तर नाना पाटेकर यांना 50 रुपये मिळायचे. त्यात घर चालणं कठिण असायचं. नाना पाटेकर यांची ही आर्थिक परिस्थिती अशोक सराफ यांना माहीत होती. नाटक संपल्यानंतर काही नट टाइमपास म्हणून पत्ते खेळायला बसायचे. त्यावेळी नाना पाटेकर मुद्दाम हरायचे. नानांना 10-15 रुपयांची मदत व्हावी म्हणून अशोक सराफ हरायचे. अशोक मुद्दाम हरायचा हे मला माहीत होतं. पण परिस्थिती आणि पैशाची गरज इतकी होती की मी ते पैसे घ्यायचो, असं नाना पाटेकर सांगायचे.

नाटक झाल्यावर मी अशोकच्या पायाची आणि डोक्याची मालिश करायचो. त्याबदल्यात अशोक मला तेव्हा 5 रुपये बक्षीस म्हणून द्यायचा. आजही अशोक भेटल्यावर मी त्याच्या डोक्याची मालिश करतो. आता तो मला 10 रुपये देतो. म्हणतो, नाना शेठ, महागाई वाढली आहे. त्यामुळे पैसे वाढवले, असं अशोक म्हणायचा, हे सांगताना नानांच्या डोळ्यातून अश्रू तरळायचे.

कोरा चेक दिला, पैसे घेतले नाही

एकदा नाना पाटेकर यांना पैशाची गरज होती. गणपतीचे दिवस होते. त्यामुळे एका सकाळी अशोक सराफ थेट नाना पाटेकरांच्या घरी आले. त्यांनी नानांना ब्लँक चेक दिला. म्हणाले, माझ्या अकाउंटमध्ये 15000 रुपये आहेत. तुला जेवढे हवेत तेवढे घे. नानांनी 3 हजार रुपये त्यातून काढले. त्यानंतर जेव्हा नाना पाटेकर यांच्याकडे पैसे आले तेव्हा ते अशोक सराफ यांना द्यायला गेले. तेव्हा, नाना शेठ खूप श्रीमंत झाले वाटतं, असं अशोक सराफ गंमतीने म्हणाले. त्यावर, अरे अशोक मी फक्त पैसे परत करतोय. वेळ परत नाही करू शकत, असं नाना म्हणाले होते. त्यानंतर अशोक सराफ यांनी हे पैसे घेतले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us