AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरांचा कोट, चेहऱ्यावर खट्याळ हसू, ‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा ‘फर्स्ट लुक’ रिलीज!

आयुष्मानच्या या फर्स्ट लूकमध्ये त्याच्या फॅन्सची नजर अधिक कोणत्या गोष्टीवर टिकली असेल तर ती आहे त्याच्या हातातलं पुस्तक.

डॉक्टरांचा कोट, चेहऱ्यावर खट्याळ हसू, 'डॉक्टर जी'मधील आयुष्मान खुरानाचा 'फर्स्ट लुक' रिलीज!
आयुष्मान खुराना
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 2:02 PM
Share

मुंबई : ‘डॉक्टर जी’ (Doctor G) जंगली पिक्चर्स प्रोडक्शनचा चित्रपट असून, त्यामध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, निर्मात्यांनी आज आयुष्मानचा बहुप्रतीक्षित ‘फर्स्ट लुक’ सादर केला आहे, जो या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटात डॉक्टरची भूमिका निभावणार आहे.

‘डॉक्टर जी’मध्ये डॉ. उदय गुप्ताची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अभिनेता आयुष्मान खुरानाने नुकत्याच सुरू झालेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, “‘डॉक्टर जी’चा विषय माझ्या खूप जवळचा आहे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करत, आम्ही सर्वजण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची वाट बघत होतो, आणि आम्हाला याचा आनंद आहे की, अखेरीस तो दिवस उगवला.”

पुन्हा एकदा धमाल करण्याची संधी!

आयुष्यमान पुढे म्हणाला की, “स्क्रीनवर पहिल्यांदाच एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चित्रीकरणासाठी खरोखरच खूप उत्साहित आहे. कारण यामुळे मला पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची आणि हॉस्टेल लाईफ जगण्याची आणि त्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.”

पाहा पोस्ट :

ट्विटरवर फर्स्ट लूक शेअर करताना आयुष्मान खुराना याने लिहिले की, “डॉक्टर जी तयार आहेत. आता शूटिंग सुरु होईल.” आयुष्मान खुरानाच्या चाहत्यांना त्याचा नवीन अवतार खूप आवडला आहे. आयुष्मानच्या या फर्स्ट लूकमध्ये त्याच्या फॅन्सची नजर अधिक कोणत्या गोष्टीवर टिकली असेल तर ती आहे त्याच्या हातातलं पुस्तक. या पुस्तकावर लिहिलेले आहे, ‘स्त्री रोग चिकित्सा’ म्हणजेच आयुष्मान या चित्रपटात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून दिसणार आहे, असा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

‘बरेली की बर्फी’ आणि ‘बधाई हो’ सारख्या दोन यशस्वी चित्रपटांनंतर ‘डॉक्टर जी’ हा जंगली पिक्चर्ससोबत आयुष्मानचा तिसरा चित्रपट आहे. आयुष्मान आणि रकुल पहिल्यांदाच ‘डॉक्टर जी’च्या निमित्ताने एकत्र येत आहेत.

अनुभूति कश्यपद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ यांनी लिहिलेला एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे. ज्यामध्ये तो मुख्य पात्र असलेल्या डॉक्टरांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

(Ayushmann Khurrana’s first look from upcoming movie Doctor G)

हेही वाचा :

Video | भर पावसात अर्ध्या रात्री रस्त्यावर बंद पडली मिका सिंहची ‘हमर’, मदतीला धावून आले मुंबईकर!

Indian Idol 12|अटी-तटीच्या सामना अन् शेवटच्या टप्प्यात पवनदीप गाण्याचे बोलच विसरला! एक चूक महागात पडणार?

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.