Indian Idol 12|अटी-तटीच्या सामना अन् शेवटच्या टप्प्यात पवनदीप गाण्याचे बोलच विसरला! एक चूक महागात पडणार?

सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’चा (Indian Idol 12) स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) याला या स्पर्धेचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणतात.

Indian Idol 12|अटी-तटीच्या सामना अन् शेवटच्या टप्प्यात पवनदीप गाण्याचे बोलच विसरला! एक चूक महागात पडणार?
पवनदीप राजन
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 12:06 PM

मुंबई : सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’चा (Indian Idol 12) स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) याला या स्पर्धेचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणतात. सुर-ताला पासून गाण्याच्या बोलापर्यंत कुठेही कधी एकही चूक केलेली नसलेल्या पवनदीप राजनने आजच्या 18 जुलैच्या भागातील सादरीकरण मध्यभागीच थांबवले. पवनदीपने आपले गाणे अशाप्रकारे अपूर्ण सोडले, हे पाहून परीक्षकांसह सर्वांना मोठा धक्का बसला होता. मात्र, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की काही आठवड्यांपूर्वी सवाई भटसमवेत ‘बॉटम टू’ गाठलेल्या पवनदीपला ही चूक आता खूप महागात पडू शकते.

आजच्या भागात पवनदीप 80 च्या दशकातील प्रसिद्ध जोडी धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्यासमोर ‘होठों से छुलो तुम, मेरा गीत अमर कर दो’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. ‘प्रेमगीत’ चित्रपटाचे हे गाणे राज बब्बर आणि अनिता राज यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. पवनदीप राजन हा जगजित सिंग यांचे हे सुंदर गाणे स्टेजवर सादर करत होता. त्याच्या आवाजाची जादू रंगमंचावर इतकी पसरली होती की, शोच्या अतिथी परीक्षक अनिता राज त्या जुन्या काळाची आठवण काढून अश्रू ढाळत होत्या.

पाहा व्हिडीओ :

सर्वांना बसला धक्का!

या सादरीकरणादरम्यान, जेव्हा पवनदीपने ‘जब प्यार करे कोई तो देखिए मन मन’ ऐवजी ‘देखे ये जीवन’ गायले, तेव्हा आपली चूक लक्षात येताच तो त्वरित थांबला. अशाप्रकारे त्याची अपूर्ण कामगिरी पाहून षण्मुखप्रियासह सर्व स्पर्धक चकित झाले. सोनी टीव्हीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, केवळ स्पर्धकच नव्हे तर हिमेश रेशमिया ते अनिता राज, अनु मलिक सगळेच स्टेजवर काय घडले, हे पाहून प्रत्येकजण थक्क झाले.

आणखी एक संधी मिळणार?

माध्यम अहवालांनुसार पवनदीपला पुन्हा एकदा रंगमंचावर गाण्याची संधी मिळाली, एवढेच नाही तर धर्मेंद्र यांनी त्याचे कौतुकही केले आणि त्याच्यासाठी खास घरातून आणलेल्या पराठे देखील खाऊ घातले. पण आता प्रश्न असा उद्भवतो की, या दुसर्‍या संधीमुळे आणि दुर्दैवाने या रिअॅलिटी शोमध्ये चूक झाल्याने वन टेक या गाण्यावर न्याय होईल, म्हणजे पवनदीपला या चुकीची किंमत मोजावी लागेल का? कारण काही आठवड्यांपूर्वी सवाई भट याच्यासोबत कमी मते मिळाल्यामुळे पवनदीपला बॉटम टूमध्ये जावे लागले होते. आता जनता काय निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

(Indian Idol 12 Contestant Pawandeep Rajan forgot the song lyrics)

हेही वाचा :

Neha Dhupia Pregnant : नेहा धुपियाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’, लवकरच करणार दुसऱ्या बाळाचे स्वागत!

आर्थिक संकटात असताना बॉलिवूडनेच मदत केली, राजपाल यादवने सांगितली व्यथा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.