Neha Dhupia Pregnant : नेहा धुपियाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’, लवकरच करणार दुसऱ्या बाळाचे स्वागत!

बॉलिवूड आभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अभिनेता-मॉडेल अंगद बेदी (Angad Bedi) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा गर्भवती आहे.

Neha Dhupia Pregnant : नेहा धुपियाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’, लवकरच करणार दुसऱ्या बाळाचे स्वागत!
नेहा धुपिया

मुंबई : बॉलिवूड आभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अभिनेता-मॉडेल अंगद बेदी (Angad Bedi) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा गर्भवती आहे. अंगद आणि नेहा लवकरच आपल्या दुसर्‍या बाळाचे स्वागत करणार आहेत. अलीकडेच नेहा धुपियाने ही चांगली बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तिच्या बेबी बंपसह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना नेहाने लिहिले, ‘हे कॅप्शन ठरवण्यात 2 दिवस लागले… आणि मला वाटतं सुचलेलं सगळ्यात उत्तम म्हणजे देवा तुझे खूप आभार…’

या फोटोमध्ये नेहा सोबतच तिचा नवरा अंगद बेदी आणि मुलगी मेहरही दिसत आहेत. तिघांनीही ब्लॅक कलरचे मॅचिंग कपडे घातले आहेत. नेहा धुपिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा फॅमिली फोटो खूपच सुंदर दिसत आहे.

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

हे वृत्त स्वतः नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी शेअर केले आहे. यानंतर अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, रोहित रेड्डी, सानिया मिर्झा, दिलजीत दोसांझ, संदीपा धार यांच्यासह अनेक सेलेब्रेटी या दोघांना शुभेच्छा देत आहेत.

खासगी सोहळ्यात लग्न

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने 3 वर्षांपूर्वी अभिनेता अंगद बेदीशी लग्न केले. नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीसोबत 10 मे 2018 रोजी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये अतिशय खासगी सोहळ्यात लग्न केले होते. 18 नोव्हेंबर 2018 रोजी 6 महिन्यांनंतर त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला होता.

नेहा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री नेहा धूपिया लवकरच एका वेब शोमध्ये कॉपच्या भूमिकेत दिसणार असून, या सीरीजमध्ये अभिनेत्री यामी गौतम देखील दिसणार आहे. याशिवाय ती विद्युत जामवाल आणि रुक्मिणी मैत्रांसोबत ‘सनक’ या अ‍ॅक्शन फिल्ममध्येही दिसणार आहे.

अंगद अखेर ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ मध्ये दिसला होता. यात त्याने अंशुमन सक्सेनाची भूमिका साकारली होती. COVID-19 अर्थात कोरोनाच्या संसर्गामुले सर्व देशभर लागलेल्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

(Neha Dhupia Pregnant Neha Dhupia will welcome another baby soon)

हेही वाचा :

आर्थिक संकटात असताना बॉलिवूडनेच मदत केली, राजपाल यादवने सांगितली व्यथा!

Top 5 Non Fiction Celebrites: छोट्या पडद्यावर गाजले, आता ‘या’ पाच कलाकारांची सोशल मीडियावरही धूम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI