AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भर पावसात अर्ध्या रात्री रस्त्यावर बंद पडली मिका सिंहची ‘हमर’, मदतीला धावून आले मुंबईकर!

शनिवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. ज्यामुळे रस्ते पाण्याने भरले आहेत. अशा परिस्थितीत काल (18 जुलै) रात्री मिका सिंह आपल्या कारमधून घरी परत जात होता, त्या दरम्यान त्याची ‘हमर’ कार अचानक बंद पडली.

Video | भर पावसात अर्ध्या रात्री रस्त्यावर बंद पडली मिका सिंहची ‘हमर’, मदतीला धावून आले मुंबईकर!
मिका सिंह
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 1:38 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) सध्या आपल्या नवीन गाण्यांबद्दल आणि सोशल मीडियावर त्याच्या नवीन शैलीबद्दल खूप चर्चेत आहे. जिथे आता त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. मिका सिंहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिका सिंह आपल्या ‘हमर’ कारमध्ये बसला आहे आणि त्याची कार भर पावसात, अर्ध्या रात्री मुंबईच्या रस्त्यावर बंद पडली आहे.

शनिवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. ज्यामुळे रस्ते पाण्याने भरले आहेत. अशा परिस्थितीत काल (18 जुलै) रात्री मिका सिंह आपल्या कारमधून घरी परत जात होता, त्या दरम्यान त्याची ‘हमर’ कार अचानक बंद पडली. त्यानंतर मिका सिंहच्या मदतीसाठी अनेक मुंबईकर भर पावसात रस्त्यावर जमले.

पाहा व्हिडीओ :

पापाराझी छायाचित्रकार विरल भयानी यांनी मिकाचा हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहु शकतो की, मिकाच्या कारभोवती बरेच लोक जमा झाले आहेत. या व्हिडीओमध्ये, मिका सिंह यांनी म्हटले आहे की, ‘मध्य रात्री आमची कार बिघडली आहे. परंतु, मुंबईत मध्यरात्रीदेखील सुमारे 200 लोक आले आणि आम्हाला मदत करण्यासाठी उभे राहिले आहेत.’

राहुल-दिशाच्या कार्यक्रमातून परतताना बिघडली कार!

गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून परत येत असताना ही घटना घडली आहे. मध्यरात्री सुमारे 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मिका सिंह जेव्हा त्याच्या कारमधून घरी जात होता, तेव्हा आकांक्षा पुरीही त्याच्याबरोबर त्याच्या कारमध्ये बसली होती. मिकाने मदतीसाठी सर्वांचे आभार मानले.

अलीकडेच गायक मिका सिंह, कमाल राशिद खानसोबतच्या त्याच्या वादामुळे चर्चेत आला होत. त्यानंतर मिका सिंहनेही केआरकेसाठी त्याच्या वतीने एक गाणे प्रसिद्ध केले. याबद्दल बरेच वादंग झाले. पण आता वाद थंडावला आहे. सर्वात जवळचा मित्र राहुल वैद्य याच्या लग्नात मिकाने बराच डान्स केला, जिथे त्याचा भाऊ दलेर मेहंदी यांनीही या लग्नात सादरीकरण केले होते.

(Mika Singh’s car break down on road at 3 am people gather for help video went viral)

हेही वाचा :

Indian Idol 12|अटी-तटीच्या सामना अन् शेवटच्या टप्प्यात पवनदीप गाण्याचे बोलच विसरला! एक चूक महागात पडणार?

Neha Dhupia Pregnant : नेहा धुपियाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’, लवकरच करणार दुसऱ्या बाळाचे स्वागत!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.