AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bappi Lahiri | कोरोनावर यशस्वी मात, बप्पी लहरींना मिळाला डिस्चार्ज! पोस्ट करत म्हणाले…

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) आता कोरोना व्हायरस संसर्गामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. बप्पी लहरी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, ते आता घरी परतले आहेत.

Bappi Lahiri | कोरोनावर यशस्वी मात, बप्पी लहरींना मिळाला डिस्चार्ज! पोस्ट करत म्हणाले...
बप्पी लहरी
| Updated on: Apr 12, 2021 | 11:06 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) आता कोरोना व्हायरस संसर्गामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. बप्पी लहरी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, ते आता घरी परतले आहेत. घरी परतल्यानंतर बप्पी लहरी यांनी प्रथम ब्रीच कँडी रुग्णालयाचे आभार मानले ज्यांनी त्यांना कोरोना विषाणू विरूद्धची लढाई जिंकण्यास मदत केली. बप्पी लहरी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते खूप खुश दिसत आहे (Bappi Lahiri gets discharge from hospital as singer wins war against corona virus).

या पोस्टच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी रुग्णालयातील स्टाफ सदस्यांचे आभार मानले आहेत. बप्पी लहरी यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांनी रंगीबेरंगी जॅकेट परिधान केले आहे. तो फोटोमध्ये थंब्स अप करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये, बप्पी लहरी यांनी सांगितले आहे की, जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वर्ग यांनी त्यांची चांगली काळजी घेतली.

पाहा बप्पी लहरींची इन्स्टाग्राम पोस्ट

बप्पी लहरी यांनी लिहिले, ‘सर्वशक्तिमान आणि प्रियजनांच्या आशीर्वादाने मी परत घरी आलो आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वर्ग यांचे विशेष आभार. आपल्या प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.’

यापूर्वी, 17 मार्च रोजी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बप्पी लहरी यांनी आपल्या चाहत्यांना कोरोना लसीकरणासाठी आपले नाव नोंदणीकृत करत असल्याची माहिती दिली होती. यासह, लसीसाठी विहित केलेल्या वयाखालील लोकांना त्यांची प्रथम नावे नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले होते (Bappi Lahiri gets discharge from hospital as singer wins war against corona virus).

कोरोनाची लागण

नुकतेच, 31 मार्च रोजी बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी बप्पी लहरी यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बप्पी लहरी यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर बाप्पी लहरीच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तथापि, आता बप्पी रूग्णालयातून घरी परत आले आहेत, तेव्हा त्यांचे चाहते देखील याबद्दल आनंदी आहेत.

बप्पी लहरी यांची ओळख

संगीतकार बप्पी लहरी यांचे खरे नाव आलोक लहरी असे असून, त्यांचा जन्म 1952मध्ये पश्चिम बंगाल स्थित जलपाईगुडीमध्ये झाला होता. 1972मध्ये ‘दादू’ या बंगाली चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर 1973साली त्यांनी ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटामध्ये काम केले. यानंतर, ताहिर हुसेन यांच्या 1976मध्ये आलेल्या ‘जखमी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

(Bappi Lahiri gets discharge from hospital as singer wins war against corona virus)

हेही वाचा :

BAFTA Awards 2021 : पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर-इरफान खानच्या आठवणींना उजाळा, प्रेक्षकही झाले भावूक!

Major Teaser : प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लाँच होणार ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.