AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhuj The Pride Of India : ‘मराठा सिर्फ दो ही बात जानता है, मारना या मरना!’, ‘भुज’चा जबरदस्त ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!

अजय देवगण (Ajay Devgn), संजय दत्त (Sanjay Dutt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) अभिनीत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’(Bhuj : The Pride of India) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलर इतका जबरदस्त आहे की, त्याचे कौतुक करताना तुम्ही देखील थकणार नाहीत.

Bhuj The Pride Of India : ‘मराठा सिर्फ दो ही बात जानता है, मारना या मरना!’, ‘भुज’चा जबरदस्त ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!
अजय देवगन
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 11:34 AM
Share

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn), संजय दत्त (Sanjay Dutt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) अभिनीत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’(Bhuj : The Pride of India) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलर इतका जबरदस्त आहे की, त्याचे कौतुक करताना तुम्ही देखील थकणार नाहीत. ट्रेलरची सुरुवात 1971मधील गुजरातच्या भुजमधून होते. यानंतर, भारतीय तिरंगा आकाशात फडकतान दिसला आहे. यानंतर असे कळते की, पाकिस्तानी हवाई दलाने भुज एअर बेसवर हल्ला केला आहे (Bhuj The Pride Of India trailer out must watch this trailer).

आता पाकिस्तानकडून झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत देश तयार आहे. त्यानंतर एअर फोर्स स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणची एंट्री आहे, ज्याला असे म्हटले जाते की, भुजची सुरक्षा आता तुमच्या हातात आहे. या नंतर संजय दत्त याची एंट्री दाखवली गेली आहे की, कोण म्हणतो की, ‘कबीरा क्यों जंग का ऐलान है, आज खुदा खुद परेशान हैं..’ त्यानंतर तो पाकिस्तानी सैन्याशी लढा देताना दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाची अगदी वेगळी आणि बोल्ड शैलीही पाहायला मिळाली. ती बर्‍यापैकी अ‍ॅक्शन करतानाही दिसणार आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन, उत्तम संवाद आणि फाइट सीन आहेत. प्रत्येक पात्राची उत्तम कामगिरी या ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते नक्कीच चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होतील.

पाहा जबरदस्त ट्रेलर :

ट्रेलर सोबतच स्क्रीनवर एक संदेशही आला की, ‘आम्ही अयशस्वी झालो, आम्ही पडलो, मोडलो, पण मग आम्ही उठलो, त्याग केला आणि त्यानंतर हिमतीचा जन्म झाला.

अजय व्यतिरिक्त संजय आणि सोनाक्षी, नोरा फतेही, अ‍ॅमी विर्क आणि संजय दत्त यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ 13 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा भुजमधील 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

अजयने केले अ‍ॅक्शन सीक्वेन्स दिग्दर्शित

तसे, अहवालानुसार, अजयने स्वत: या चित्रपटाचे अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे साउथ स्टंट कोऑर्डिनेटर काही दिवस उपलब्ध नव्हते, म्हणून अजयने स्वत: अ‍ॅक्शन सिक्वन्स दिग्दर्शित केले.

एका वेबसाईटनुसार प्रवक्त्याने सांगितले की, ‘अजयने चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण केले हे खरे आहे. अ‍ॅक्शन सिक्वेन्सचे दिग्दर्शन करणार्‍या पेटल हेन मार्चच्या मध्यात शूटसाठी येऊ शकले नाहीत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही काळ पवई स्टुडिओ बुक केल्यामुळे त्यांनी पुन्हा अजयला याची जबाबदारी घ्यायला सांगितले. ज्यांनी अजयला पाहिले असेल, त्यांना त्याचे वडील वीरू देवगण यांची झलक त्यांच्यामध्ये नक्कीच दिसली असेल.’

(Bhuj The Pride Of India trailer out must watch this trailer)

हेही वाचा :

Indian Idol 12 | इंडियन आयडॉल 12च्या स्पर्धेतून आशिष कुलकर्णी बाद, ‘हे’ असणार टॉप 6 स्पर्धक!

VIDEO : मंदिरा बेदीचा आईसोबत वॉक; पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्पॉट!

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...