Bhupinder Singh: गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाने संगीतप्रेमींवर शोककळा; ट्विट करत व्यक्त केल्या भावना

गेली काही वर्षे ते चित्रपट संगीतापासून दूर होते. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात त्यांनी तीन दशकांची कारकिर्द गाजवली. मूळ अमृतसरचे असलेल्या भूपिंदर यांच्या कारकिर्दीची सुरुवात दिल्ली आकाशवाणी केंद्रातून झाली होती.

Bhupinder Singh: गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाने संगीतप्रेमींवर शोककळा; ट्विट करत व्यक्त केल्या भावना
Bhupinder Singh
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 19, 2022 | 11:39 AM

हिंदी चित्रपट संगीतात पार्श्वगायक म्हणून ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह (Bhupinder Singh) यांचं सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता क्रिटी केअर रुग्णालयात निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. दहा दिवसांपूर्वी त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कर्करोग (Cancer) झाल्याचं प्राथमिक निदान डॉक्टरांनी केलं होतं. त्यानुसार तपासणी सुरू होती, मात्र पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला. रुग्णालयातच उपचारादरम्यान भूपिंदर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. भूपिंदर यांच्या निधनानंतर संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत भूपिंदर यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.

‘अनेक दशकं अविस्मरणीय गाणी गाणारे भूपिंदर सिंहजी यांच्या निधनाने दुःखी झालो आहे. त्यांच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह आहेत. ओम शांती,’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त केल्या. ‘भारतीय संगीत आणि चित्रपट इंडस्ट्रीतील त्यांचं योगदान पुढील पिढ्यांसाठी जपलं जाईल’, असं एका चाहत्याने ट्विट केलं. तर ‘आपल्या गाण्यांतून ते कायम चाहत्यांच्या स्मरणात राहतील’, असं दुसऱ्याने युजरने लिहिलं.

ट्विटरवर शोक व्यक्त

गेली काही वर्षे ते चित्रपट संगीतापासून दूर होते. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात त्यांनी तीन दशकांची कारकिर्द गाजवली. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, दिल धुंडता है, नाम गुम जायेगा, एक अकेला इस शहर मे, जिंदगी मेरे घर आना ते अगदी अलिकडे सत्या चित्रपटातील ‘बादलों को काट काट कर’ या गाण्यापर्यंत खास त्यांच्या आवाजातील गाणी अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत. मूळ अमृतसरचे असलेल्या भूपिंदर यांच्या कारकिर्दीची सुरुवात दिल्ली आकाशवाणी केंद्रातून झाली होती.