AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan | पठाण चित्रपटातील दीपिका पादुकोण हिच्या बिकिनीच्या रंगावरून मोठा वाद

काहींना दीपिकाचे कपडे आवडले नाहीतर काहींना तिचे हावभाव आवडले नाहीत.

Pathaan | पठाण चित्रपटातील दीपिका पादुकोण हिच्या बिकिनीच्या रंगावरून मोठा वाद
| Updated on: Dec 14, 2022 | 4:23 PM
Share

मुंबई : शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण हा चित्रपट रिलीजच्या अगोदरच वादात सापडलाय. या चित्रपटाचे बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाले असून या गाण्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. काहींना दीपिकाचे कपडे आवडले नाहीतर काहींना तिचे हावभाव आवडले नाहीत. आता या गाण्यामुळे मोठा वाद सुरू झालाय. इतकेच नाहीतर याचा मोठा फटका हा चित्रपटाला बसण्याची दाट शक्यता आहे. कारण एका राज्याच्या गृहमंत्र्यांनी चित्रपट राज्यामध्ये रिलीज करण्याच्या अगोदर विचार करावा लागणार असल्याचे म्हटले आहे.

पठाण चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण हिने केशरी रंगाची बिकिनी घातल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये. इतकेच नाहीतर यांचे चित्रपट चालत नसल्याने आता यांनी अश्लील चित्रपट तयार करण्यास सुरूवात केल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, गाण्यात वापरण्यात आलेली वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह नक्कीच आहे. भ्रष्ट मानसिकतेमुळे हे गाणे चित्रित करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. इतकेच नाहीतर दीपिका पादुकोण ही जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँगचे समर्थन करताना देखील दिसली होती.

मी निवेदन करत आहे की, चित्रपटातील दृश्ये आणि वेशभूषा ठिक करा नाहीतर मध्यप्रदेशमध्ये या चित्रपटाच्या रिलीजसाठी परवानगी मिळणार की नाही हा विचार करण्यासारखी बाब आहे. यामुळे आता पठाण चित्रपटाच्या समस्या वाढताना नक्कीच दिसत आहेत.

पठाण चित्रपटातील गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बायकॉट पठाण हा ट्रेंड सुरू आहे. आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा रिलीज होण्याच्या अगोदरच अशाच प्रकारचा ट्रेंड हा सोशल मीडियावर सुरू होता. इतकेच नाहीतर आमिर खानचा चित्रपटही फ्लाॅप गेला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?