सलमान खान स्टारर ‘कभी ईद कभी दिवाली’ संदर्भात मोठे अपडेट, चित्रपट बंद होण्यावर निर्मात्यांनी सोडले मौन!

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) त्यांच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. सलमान खानच्या चित्रपटांचे चाहते नेहमीच वाट पाहत असतात. चाहत्यांमध्ये सलमान खानच्या चित्रपटांची घोषणा होताच, त्यांची उत्सुकता वाढते.

सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' संदर्भात मोठे अपडेट, चित्रपट बंद होण्यावर निर्मात्यांनी सोडले मौन!
Salman Khan

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) त्यांच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. सलमान खानच्या चित्रपटांचे चाहते नेहमीच वाट पाहत असतात. चाहत्यांमध्ये सलमान खानच्या चित्रपटांची घोषणा होताच, त्यांची उत्सुकता वाढते. काही काळापूर्वी ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, सलमान खानला या चित्रपटासाठी घेतल्याची गोष्टही समोर आली होती.

सलमान खानच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची खूप चर्चा झाली असे, म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अलीकडेच बातमी आली होती की, हा चित्रपट बंद होणार आहे. मात्र, यावर कोणाचीही प्रतिक्रिया आली नव्हती.

जाणून घ्या नेमकं सत्य काय?

अलीकडेच अशी बातमी आली होती की, मेकर्स सलमान खानचा हा आगामी चित्रपट बंद करण्याच्या मूडमध्ये आहेत. तर, आधी असे वृत्त आले होते की, निर्माते चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा विचार करत आहेत. तथापि, चित्रपटाबद्दल शंका कायम आहे.

‘कभी ईद कभी दिवाली’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर या अहवालाबद्दल मीडिया पोर्टलवर टीका केली आहे आणि या गोष्टींना केवळ फेक न्यूज म्हटले आहे. निर्मात्यांनी यावर स्पष्ट केले आहे की, ‘कभी ईद कभी दिवाली’ची 2 गाणी आधीच रेकॉर्ड केली गेली आहेत.

अशा परिस्थितीत चित्रपट बंद झाल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. हे लोक प्रेक्षकांनची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. एवढेच नाही तर, प्रोडक्शन हाऊसच्या बाजूने असे सांगितले गेले आहे की, चित्रपटाचा सेट आता तयार केला जात आहे आणि 2 महिन्यांनंतर चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू होईल. म्हणजेच, आता हे पूर्णपणे स्पष्ट आहे की, ‘कभी ईद कभी दिवाली’ चाहत्यांसमोर सादर केला जाईल. मात्र, हा चित्रपट सादर करण्यास बराच वेळ लागणार आहे.

सलमान खान शूटिंगमध्ये व्यस्त

सलमान खान परदेशात आपल्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत ‘Antim: The Final Truth’ या चित्रपटातही दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे एक खास गाणेही रसिकांसमोर सादर करण्यात आले आहे.

हेही वाचा :

‘बिग बॉस’ फेम मोनालिसाने पुन्हा वाढवला इंटरनेटचा पारा, नव्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया…

Happy Birthday Ramya Krishnan | श्रीदेवीने नाकारलेली भूमिका वाट्याला आली, ‘शिवगामी’ बनून राम्या कृष्णनने प्रसिद्धी मिळवली!

लेकाने संगीत दिलेलं गाणं ऐकून नाराज एसडी बर्मन मान खाली घालून स्टुडिओ बाहेर पडले, वाचा ‘दम मारो दम’चा किस्सा

Love Story : बिग बॉसपासून झाली प्रेमाची सुरुवात, जाणून घ्या प्रिन्स नरुला आणि युविकाची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI