AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | बादशाह अव्वल, TIME 100 पोलमध्ये बाॅलिवूडचा किंग शाहरुख खान अव्वल

शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये. आता सध्या शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Shah Rukh Khan | बादशाह अव्वल, TIME 100 पोलमध्ये बाॅलिवूडचा किंग शाहरुख खान अव्वल
| Updated on: Apr 07, 2023 | 2:56 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केलीये. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (Movie) ठरलाय. पठाण चित्रपटाने ओनपिंग डेलाच जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिसवर (Box office) कलेक्शन केले. पठाण चित्रपटाला फक्त भारतामधूनच नाहीतर विदेशामधूनही प्रचंड प्रेम मिळाले. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिले की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही.

पठाण चित्रपटाच्या तूफान कामगिरीनंतर लगेचच शाहरुख खान याने डंकी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. आता सध्या शाहरुख खान हा जवान चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे या पूर्वीच शाहरुख खान याने दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पठाण चित्रपटाची वाट आतुरतेने पाहात होते.

शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शाहरुख खानने 2023 चा टाइम 100 पोल जिंकला आहे आणि टाइम 100 च्या यादीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व बनला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये शाहरुख खान याने अनेक दिग्गज लोकांना मागे टाकले आहे.

2023 टाइम 100 पोलसाठी तब्बल 12 लाखांहून अधिक लोकांनी वोट केले. ज्यामध्ये शाहरुख खान पहिल्या स्थानावर राहिला आहे. विशेष बाब म्हणजे या यादीमध्ये सेरेना विल्यम्स, मार्क झुकेरबर्ग, मिशेल येओह यांचाही समावेश आहे. फुटबॉल स्टार लियोनेल मेसी पाचव्या क्रमांकावर आहे. शाहरुख खान याचे चाहते फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशातही आहेत.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात सतत विरोध केले जात होता. मात्र, यादरम्यान शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान याने काही खास पठाण चित्रपटाचे प्रमोशनही केले नाही. परंतू चित्रपटाने धमाकेदार कामगिरी नक्कीच बाॅक्स आॅफिसवर केलीये.

पठाण चित्रपच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.