Ranbir Kapoor: फक्त 250 रुपये होती रणबीरची पहिली कमाई; आज आहे इतक्या संपत्तीचा मालक

रणबीर कपूरची पहिली कमाई पाहून नीतू कपूर खूप भावूक झाल्या होत्या. त्यावेळी रणबीरने त्याची पहिली कमाई त्याच्या आईच्या हातात दिली होती. रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हे पाहून त्याची आई भावूक झाली होती.

Ranbir Kapoor: फक्त 250 रुपये होती रणबीरची पहिली कमाई; आज आहे इतक्या संपत्तीचा मालक
Ranbir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 1:01 PM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर रणबीरने यावर्षी ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपटातून पुनरागमन केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. यानंतर ‘ब्रह्मास्त्र’कडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. रणबीरने आपल्या 15 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो त्याच्या स्टाईल आणि लूकमुळेही खूप चर्चेत असतो.

रणबीर कपूर हा इंडस्ट्रीतील सर्वात डिमांडिंग स्टार्सपैकी एक आहे. यामुळेच तो एका चित्रपटासाठी तगडं मानधन घेतो. याशिवाय तो बॉलिवूडच्या प्रभावशाली कपूर घराण्याशी संबंधित आहे. सध्याच्या घडीला रणबीर जरी तगडं मानधन घेत असला तरी एक वेळ अशी होती जेव्हा त्याला त्याची पहिली कमाई म्हणून फक्त 250 रुपये मिळत होते. खुद्द रणबीरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. 1996 मध्ये आलेल्या ‘प्रेम ग्रंथ’ चित्रपटासाठी त्याला 250 रुपये मिळाले होते. या चित्रपटासाठी रणबीरने एडी म्हणजेच असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. यामध्ये त्याचे वडील ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.

रणबीर कपूरची पहिली कमाई पाहून नीतू कपूर खूप भावूक झाल्या होत्या. त्यावेळी रणबीरने त्याची पहिली कमाई त्याच्या आईच्या हातात दिली होती. रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हे पाहून त्याची आई भावूक झाली होती. रणबीरसाठी तो क्षण एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नव्हता. काही रिपोर्ट्सनुसार रणबीर अजूनही त्याच्या आईकडून दर आठवड्याला पॉकेटमनी घेतो.

हे सुद्धा वाचा

रणबीर कपूरने स्वतः इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं आहे. तो अतिशय आलिशान जीवन जगतो. त्याचं मुंबईतील वांद्रे याठिकाणी एक आलिशान घर आहे. रणबीरने हे घर 2016 मध्ये 35 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. रणबीरचे दिवंगत वडील ऋषी कपूर यांनी खूप मोठा वारसा मागे सोडला आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती 256 कोटी रुपये होती. त्यात त्यांचा आलिशान बंगला, कार कलेक्शन आणि इतर मालमत्तेचाही समावेश आहे. रणबीरकडेही स्वत:ची भरपूर संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 45 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 359 कोटी रुपयांच्या घरात आहे. चित्रपट, ब्रँड प्रमोशन, एंडोर्समेंट इत्यादी रणबीरच्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत. तो एका चित्रपटासाठी जवळपास 18 ते 20 कोटी रुपये मानधन घेतो. तर ब्रँड एंडोर्समेंटमधून 5 कोटी रुपये कमावतो.

रणबीर कपूरकडे कारचं चांगलं कलेक्शन आहे. 2017 मध्ये रेंज रोव्हरची SUV रणबीरच्या वाहनांच्या कलेक्शनमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. ज्याची किंमत 2.26 कोटी रुपये होती. त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ जी63 एएमजी देखील आहे, ज्याची किंमत 2.14 कोटी रुपये आहे. रणबीरच्या लक्झरी कारच्या ताफ्यात ऑडी R8 देखील सामील आहे. ज्याची किंमत 2.72 कोटी आहे. एकूणच रणबीरने आपल्या गाड्यांवर ७ कोटींहून अधिक खर्च केला आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.