AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने अवघ्या दोनच दिवसात कमावले इतके कोटी, 100 कोटींचा आकडा 3 दिवसात पार होणार?

ब्रह्मास्त्र चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 42 कोटींची कमाई केलीयं. आज रविवार असल्याने चित्रपटाच्या कमाईमध्ये अजून वाढ होणार असल्याचा अंदाजा बांधला जातोयं. रणबीर आणि आलियाच्या या चित्रपटाला चाहत्यांचा प्रतिसाद नक्कीच मिळतोयं.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने अवघ्या दोनच दिवसात कमावले इतके कोटी, 100 कोटींचा आकडा 3 दिवसात पार होणार?
| Updated on: Sep 11, 2022 | 11:59 AM
Share

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केलीयं. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 36.50 कोटी रुपयांची कमाई केल्याने बाॅलिवूड (Bollywood) कलाकरांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल दाखू शकत नव्हते. अशातच ब्रह्मास्त्र चित्रपटाने ओपनिंग डेलाच (Opening Day) चांगली कमाई केली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीप्रमाणेच चित्रपटाचे बाॅक्स आॅफिसवरील कलेक्शन दुसऱ्या दिवशीही चांगले राहिले.

ब्रह्मास्त्र चित्रपटाची दुसऱ्या दिवशी 42 कोटींची कमाई

ब्रह्मास्त्र चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 42 कोटींची कमाई केलीयं. आज रविवार असल्याने चित्रपटाच्या कमाईमध्ये अजून वाढ होणार असल्याचा अंदाजा बांधला जातोयं. रणबीर आणि आलियाच्या या चित्रपटाला चाहत्यांचा प्रतिसाद नक्कीच मिळतोयं. विशेष बाब म्हणजे 42 कोटींपैकी 37 ते 38 कोटींची कमाई फक्त हिंदी व्हर्जनमधून झालीयं. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट फेल जात असताना ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिलासादायक ठरतोयं.

ब्रह्मास्त्र चित्रपटाची आतापर्यंत 78 कोटींची कमाई

आलिया आणि रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने आतापर्यंत 78 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाला वीकेंडचा मोठा फायदा झाला आहे. हा चित्रपट शंभर कोटींच्या आकडा पार करेल, असे सांगितले जातंय. अयान मुखर्जीचा बहुचर्चित ब्रह्मास्त्र चित्रपट हा 9 सप्टेंबरला प्रदर्शित झालाय. सुरूवातीपासूनच चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. रणबीर, आलिया आणि अमिताभ बच्चन यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.