AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरावर कुणाची कृपा? किती निधी मंजूर? मोठी माहिती उघड

नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी २०१८ मध्ये महायुती सरकारकडून दीड कोटींचा निधी मंजूर झाल्याचा जीआर समोर आला असून, यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य असल्याचे उघड झाले आहे.

अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरावर कुणाची कृपा? किती निधी मंजूर? मोठी माहिती उघड
ashok kharat temple nashik
| Updated on: Mar 25, 2026 | 10:37 AM
Share

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता नवनवीन खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन महायुती सरकारने तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची बाब आता उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हा निधी मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी २०१८ मधील एक शासन निर्णय (GR) आता चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर भोंदूगिरीचे आरोप झाल्यानंतर आता त्याच्या ईशान्येश्वर मंदिराबद्दलची एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नुकतंच ईशान्येश्वर मंदिराच्या बांधकाम कोणी केले, याबद्दलची माहिती समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणाच्या तपासादरम्यान ३१ मार्च २०१८ रोजीचा एक सरकारी जीआर समोर आला आहे. यावेळी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या जीआरनुसार, मंदिराच्या परिसरातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

निधीतून कोणती कामे झाली?

सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या निधीतून मंदिराच्या परिसराचा कायापालट करण्यासाठी खालील कामे करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. यात भाविकांच्या निवासासाठी भव्य भक्तनिवासाचे बांधकाम करण्यात येणार होते. त्यासोबतच ईशान्येश्वर मंदिराचे सुशोभीकरण केले जाणार होते. तसेच संपूर्ण रस्ता आणि परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि चेंजिंग रूमची व्यवस्था केली जाणार होती. त्यासोबतच ईशान्येश्वर मंदिरात भव्य सभामंडपाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग ही कामेही यातून करण्यात येत होती.

सर्वपक्षीय नेत्यांचा वरदहस्त

याप्रकरणाच्या तपासात असे दिसून आले आहे की, खरातला केवळ एकाच पक्षाकडून नव्हे, तर सर्वपक्षीय नेत्यांकडून मदत मिळत होती. ईशान्येश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सुनियोजित असावा, यासाठी खरातने राजकीय वजन वापरून हा निधी पदरात पाडून घेतला होता. सरकारी कागदपत्रांमध्ये प्रत्येक कामासाठी किती निधी खर्च करण्यात यावा, याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

आता हा जुना जीआर समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच एका भोंदूबाबाच्या कथित धार्मिक स्थळासाठी सरकारी पैसा इतक्या मोठ्या प्रमाणावर कसा खर्च झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत