AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्ध भारत थांबू शकतो, इस्त्रायलचा मोठा दावा, अमेरिका आणि इराणसोबत..

इराणवर 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याने खळबळ उडाली. जग या युद्धात होरपळताना दिसले. आता युद्धाबाबत मोठी माहिती पुढे येत असून इस्त्रायलकडून मोठा दावा करण्यात आला.

इराण युद्ध भारत थांबू शकतो, इस्त्रायलचा मोठा दावा, अमेरिका आणि इराणसोबत..
Israeli Ambassador Reuven Azar
| Updated on: Mar 25, 2026 | 10:40 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. शेवटी पाच दिवसांकरिता अमेरिकेकडून युद्धबंदी जाहीर करण्यात आली. युद्ध थांबवण्याकरिता काही देशही पुढे आलीत. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणकडून आम्हाला प्रस्ताव आला आहे. युद्ध थांबवण्याकरिता इराणकडून अटी ठेवण्यात आल्या. जोपर्यंत या अटी पूर्ण होणार नाहीत, तोवर कोणत्याह परिस्थितीत युद्ध थांबवले जाणार नसल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात आले. भारताचे या सर्व गोष्टींवर बारीक नजर आहे. इस्त्रायल आणि इराण या दोघांसोबतही भारताचे चांगले संबंध आहेत. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात थेटपणे परिणाम होत आहेत. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा असून कच्च्या तेलाचीही समस्या आहे. यासोबतच तेलाच्या किमती वाढल्याचे मोठा परिणाम होत आहे. होर्मुज खाडीत भारताचे 20 जहाजा अडकून पडली आहेत. युद्धादरम्यान इराणकडून भारताचे जहाज सोडले गेले. भारतात एलपीजी गॅसचा पुरवठा होर्मुज खाडीच्या माध्यमातूनच होतो.

इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, अशी जगाची अपेक्षा आहे. यादरम्यानच इराण युद्ध संपवण्यात भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे मोठे विधान दिल्लीतील इस्त्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी केले. रुवेन अझर यांनी म्हटले की, पश्चिम आशियामध्ये भारताचे महत्त्वपूर्ण हितसंबंध आहेत. या युद्धात मध्यस्थ म्हणून पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तच्या भूमिकेचेही कौतुक केले.

रुवेन अझर यांनी पुढे बोलताना म्हटले की, आपण राजनयिकरणाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आम्ही भारताच्या भूमिकेचे स्वागत करतो. कारण यादरम्यान भारताची भूमिका अनुकूल आहे. पश्चिम आशिया भारताचे संबंध चांगले आहेत आणि तिथे अनेक भारतीय राहतात. भारत एक आर्थिक महासत्ता आहे. पश्चिम आशियामध्ये अनेक सहकार्य प्रकल्प देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.

हे युद्ध भारत थांबू शकत असल्याचे इस्त्रायलकडून स्पष्ट सांगण्यात आले. सुरूवातीपासूनच या युद्धात भारताची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारताने दोन्ही देशांना वेळोवेळी संपर्क करून युद्ध थांबवण्याबद्दल चर्चा केली. या युद्धाचा थेटपणे मोठ्या प्रमाणात फटका भारताला बसताना दिसला आहे.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार