AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी इराणमधून आनंदाची बातमी, थेट मोठे गिफ्ट मिळण्याचे संकेत, भारताचे 20..

Iran eases Hormuz Access : इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला. इराणवर करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आणि युद्धाला सुरूवात झाली. या युद्धादरम्यान इराणकडून महत्वाची होर्मुज खाडी बंद ठेवली. आता त्याबाबत अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी पुढे येत आहे.

भारतासाठी इराणमधून आनंदाची बातमी, थेट मोठे गिफ्ट मिळण्याचे संकेत, भारताचे 20..
Iran eases Hormuz Access
| Updated on: Mar 25, 2026 | 10:03 AM
Share

मध्य पूर्वेत स्थिती वाईट आहे. इराणकडून या युद्धात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अमेरिकेने अनेक प्रयत्न ही खाडी खुली करण्याकरिता केले. हेच नाही तर त्यांनी काही देशांचे नाव घेत थेटपणे मदतही मागितली. पण एकही देश त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. शेवटी होर्मुज खाडीत आपल्याच दबाव कायम ठेवण्यात इराणला यश मिळाले. इराणच्या तटबंदी नष्ट करण्याकरिता होर्मुजमध्ये अमेरिकी सैन्य उतरणार असल्याचे सांगितले जात होते, तशी तयारीही अमेरिकेने सुरू होती. पण त्यांना अपयश मिळाले. होर्मुज खाडीत काहीही केले तर आम्ही सर्व खाडीच बंद करू असा इशारा इराणकडून देण्यात आल्यानंतर अमेरिकेने मोठी घोषणा करत थेट 5 दिवसांकरिता युद्ध थांबवत असल्याचे जाहीर केले. या युद्धात अमेरिका एकटी पडली आहे. अमेरिकेने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्यांच्या या धमकीनंतर थेट इराणकडून अमेरिकेसोबत संबंध असलेल्या सर्व प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली.

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला. तेव्हापासून युद्धाला सुरूवात झाली. होर्मुज खाडी यादरम्यान इराणकडून बंद करण्यात आली. सध्याच्या घडीला भारताचे 20 तेलवाहू जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत. 25 दिवसानंतर आता भारताला आनंदाची बातमी मिळत आहे. इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्याचे संकेत देण्यात आले. मात्र, त्यांनी एक मोठी अट ठेवली.

इराणने इतर देशांचे जहाज सोडण्याचे संकेत दिले असले तरीही त्यांनी अट ठेवत स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्त्रायल यांचे जहाज आम्ही सोडणार नाही. आमच्या स्वत: च्या संरक्षणासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत. म्हणजे भारताचे अडकलेले 20 जहाज भारताच्या दिशेने येऊ शकतात. भारतात एलपीजी गॅसचा पुरवठा होर्मुज खाडीतूनच होतो. ही खाडी बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा बघायला मिळाला.

अनेक हॉटेल यादरम्यान बंद झाली. होर्मुज खाडीतून जाताना जहाजांना इराणच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करूनच जावे लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जहाजांना इराणच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करावी लागेल. सुरक्षित मार्ग नक्की कोण हे इराणचे अधिकारी जहाजांना सांगतील. इराणच्या या निर्णयाने कच्चे तेल आणि गॅसची समस्या दूर होऊ शकते. यासोबतच जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमतीही कमी होऊ शकतात.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार